18 November 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार असूनही ट्रेन सोडू शकतो | तर कोकणी जनतेने विचार करावा - नितेश राणे

MLA Nitesh Rane

मुंबई, ०७ सप्टेंबर | रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं.

कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार असूनही ट्रेन सोडू शकतो, तर जनतेने विचार करावा – BJP MLA Nitesh Rane after green signal to Modi Express in Konkan :

कोकणात भारतीय जनता पक्षाचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा चिमटा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला.

नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा टोला लगावला. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. या एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यापूर्वी नितेश राणे शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती ऊणीव आजमभरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा त्यांनी काढला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane after green signal to Modi Express in Konkan.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x