आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कोकणातील ११ आमदार घरी बसवणार | राणेंची गर्जना
मुंबई, ३ ऑक्टोबर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांना पराभूत करणार. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना पूर्णपणे हद्दपार करणार अशी राजकीय गर्जना भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून शिवसेनेवर हल्लाबोल केला. कोकणातील शिवसेनेच्या सर्व ११ आमदारांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून संपूर्ण शिवसेनेला हद्दपार केलं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे आता ५६ आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या आगामी विधानसभा निवडणुकीत कमी होईल, असा थेट दावा देखील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.
मुख्य म्हणजे शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत हे लक्षात घ्यावं. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील.त्या चिंतेमुळेच ते घरातील पिंजऱ्यातून अजिबात बाहेर पडत नाहीत, असा प्रहार राणेंनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे कोकणातील हे ११ आमदार विधानसभेत कधी कोकणातील विकासा संदर्भात काही प्रश्न उपस्थित करतात किंवा बोलतात का? कोकणासाठी अधिकृतपणे जाहीर केलेला फंड देखील महाविकास आघाडी सरकार देत नाहीत. त्यामुळे यांचे आमदार काहीही करू शकत नाही. त्यात पालकमंत्री तर पूर्णपणे निष्क्रीय आहेत असा प्रहार राणेंनी केला. कोकणातील विकासाला काही करून चालना मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
News English Summary: We will defeat all the Shivsena MLAs in Konkan during forthcoming assembly elections in the state. BJP’s Rajya Sabha MP and former Chief Minister Narayan Rane has made a political roar that everyone will be housed and Shiv Sena will be completely expelled from Konkan. MP Narayan Rane held a press conference today and attacked Shiv Sena. All 11 Shiv Sena MLAs from Konkan will be housed in the next assembly elections. He said that the entire Shiv Sena would be expelled from Konkan.
News English Title: BJP MP Narayan Rane criticized Shivsena MLAs over Konkan issue News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS