21 April 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

अजब | झोपलेल्या केंद्रीय समितीकडून तब्बल २१ दिवसानंतर कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Konkan Cyclone

सिंधुदुर्ग, ०७ जून | जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे सादर करणार, अशी माहिती यावेळी समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली.

दरम्यान जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल आपण केंद्राकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली. आज या समितीने देवगड, मालवण तालुक्यातील किनारी भागातील नुकसानीची पाहणी केली. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पाहणीसाठी फिरणाऱ्या या समितीच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

देवगड व मालवण तालुक्यात पाहणी:
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर, मुणगेसह या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी आचरा, मालवण, चिवला बीच, वायरी, तारकर्ली, देवबाग या नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. या समितीमध्ये अर्थविभागाचे प्रमुख अभय कुमार, केंद्रीय कृषी खात्याचे सिंग, ऊर्जा विभागाचे प्रमुख जे.के. राठोड, केंद्रीय मत्स्य विभागाचे प्रमुख अशोक कदम यांचा समावेश होता. यावेळी तत्कालीन प्रांताधिकारी तुषार मठकर, मालवण-कुडाळचे प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे आदी उपस्थित होते. मालवण येथे चिवला किनाऱ्याची पाहणी करून समिती सदस्यांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व वीज वितरणच्या अभियंता सौ. गिरकर यांच्याशी चर्चा केली.

खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना:
केवळ वादळामुळे नुकसानी झाल्यावरच वीज पोल न बदलता खबरदारी म्हणून खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना समिती सदस्यांनी केली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी मालवण हे समुद्र किनारी वसलेले असल्याने वीज पोलांना गंज लागून ते खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत ही बाब निदर्शनास आणून दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे मोठी हानी झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेने योग्य ते पंचनामे केले आहेत का ? याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय समितीचा दौरा असून याचा योग्य तो अहवाल केंद्राकडे सादर करण्याचे समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी सांगितले.

 

News English Summary: The Central Committee, which arrived in the district to inspect the damage 21 days after the storm hit the district, visited Devgad, Malvan today. The committee inspected the convoy of vehicles from the coastal area under heavy police security. The report of the panchnama will be submitted to the Center, informed the chairman of the committee Ashok Parmar.

News English Title: Central committee inspects cyclone affected area after 21 days in Sindhudurg news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या