24 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही - निलेश राणे

CM Uddhav Thackeray, Former MP Nilesh Rane, Raigad Emergency Relief Fund

मुंबई, ५ जून: बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यामुळे तूर्तास तातडीची मदत म्हणून हा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

यावर अधिक महिती देत मुख्यमंत्री म्हणाले, आपण कोणतंही भलंमोठं आर्थिक पॅकेज जाहीर करणार नाही. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत व्हावी यासाठी १०० कोटींचा निधी दिला जात आहे. तसंच नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागतील. त्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे इथल्या अनेक घरांचं नुकसान झालं. विजेचे खांब पडले. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

दुसरीकडे, माजी खासदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना केवळ रायगडला भेट देऊन पळ काढल्याचं म्हटलं आहे. त्यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, पण रायगडमध्ये फक्त १/२ ठिकाणी पाहणी करून परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीत सुधा अनेक गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय पण ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही… अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर.”

 

News English Summary: The Chief Minister announced compensation of Rs 100 crore for Raigad district, but returned to Mumbai after inspecting only 1-2 places in Raigad. There are many villages in Sindhudurg and Ratnagiri where there is a lot of damage but the Chief Minister does not have time to inspect it said former MP Nilesh Rane.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray does not have time to inspect Sindhudurg and Ratnagiri said former MP Nilesh Rane News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x