रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
मुंबई, ५ जून: बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यामुळे तूर्तास तातडीची मदत म्हणून हा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री @iAditiTatkare यांनी मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती दिली. मंत्री @AUThackeray , मंत्री @AslamShaikh_MLA उपस्थित होते. pic.twitter.com/RKTLI8g3ka
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 5, 2020
यावर अधिक महिती देत मुख्यमंत्री म्हणाले, आपण कोणतंही भलंमोठं आर्थिक पॅकेज जाहीर करणार नाही. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत व्हावी यासाठी १०० कोटींचा निधी दिला जात आहे. तसंच नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागतील. त्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे इथल्या अनेक घरांचं नुकसान झालं. विजेचे खांब पडले. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अन्य मुद्दे ;
- निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव रायगडकरांनी प्रत्यक्षात घेतला.
- कोकणवासीय भीषण तांडवाला तोंड देत होते.
- जीवितहानी टाळण्यास प्रशासन यशस्वी
- रायगडसाठी १०० कोटीचा निधी देतोय
- नुकसानीच्या पंचनाम्यांना ४ ते ६ दिवस लागतील
- वादळाचे संकट गेलं तरी कोरोनाचं संकट कायम आहे
- प्रशासन सतर्क आहे
दुसरीकडे, माजी खासदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना केवळ रायगडला भेट देऊन पळ काढल्याचं म्हटलं आहे. त्यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पण रायगडमध्ये फक्त १/२ ठिकाणी पाहणी करून परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीत सुधा अनेक गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय पण ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही… अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर.”
रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पण रायगडमध्ये फक्त १/२ ठिकाणी पाहणी करून परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीत सुधा अनेक गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय पण ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही… अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 5, 2020
News English Summary: Many talukas in Raigad district were badly affected by the ‘Nature Cyclone’ that hit Maharashtra on Wednesday. Against this backdrop, Chief Minister Uddhav Thackeray has announced a fund of Rs 100 crore for Raigad district as an emergency relief.
News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has announced a fund of Rs 100 crore for Raigad district as an emergency relief News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON