21 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंच - देवेंद्र फडणवीस

Chipi Airport

नागपूर, ०८ सप्टेंबर | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बेळगावचा निकाल म्हणजे मराठी माणसाचा विजय असून हा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटल आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पत्रकरांसोबत बोलत होते.

चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंच – Chipi Airport credit goes to union minister Narayan Rane said Devendra Fadnavis :

गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू:
आगामी काळात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोवा राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. गोवा सरकारने केलेल्या कामच्या जोरावर तेथील जनता पुन्हा भाजपला सत्ता देईल, असेही ते म्हणाले. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या योगी सरकारचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले आहेत. योगी सरकारने सर्व समाजाच्या विकासासाठी काम केले असल्याचे ते म्हणाले आहेत.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती प्रचंड जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

चिपी विमानतळाचे श्रेय राणे यांनाच:
फडणवीससिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडलेला आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते चिपी विमानतळ उद्घाटन होणार आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाचे श्रेय हे नारायण राणे यांनाच असल्याचे वक्तव्य केले आहे. यात श्रेयवादाची लढाई नसून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्याने सर्व वाद सोडवले पाहिजे असेही ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chipi Airport credit goes to union minister Narayan Rane said Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x