22 February 2025 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राष्ट्रवादीत इनकमिंग | काँग्रेस नेते काका कुडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Congress leader Kaka Kudalkar, join NCP, Rajan Teli

कणकवली, २४ ऑक्टोबर: सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Kaka Kudalkar join NCP) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघात काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली होती. स्वभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कुडाळकर यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आक्रमक आणि अभ्यासू नेता अशीही काका कुडाळकरांची ओळख आहे. मात्र, 2014 च्या निवडणुकीदरम्यान नितेश राणे यांच्याशी वाद झाल्याने, काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. मात्र, आक्रमक काका कुडाळकर भाजपमध्ये रमले नाहीत. त्यानंतर काका कुडाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

 

News English Summary: In Sindhudurg, the NCP pushed the allied Congress. Konkan Congress leader and former president of Sindhudurg Zilla Parishad Kaka Kudalkar has joined NCP. (Kaka Kudalkar joins NCP) In the presence of Co-operation Minister Balasaheb Patil, Kaka Kudalkar joined NCP. It is seen that incoming has started in NCP.

News English Title: Congress leader Kaka Kudalkar join NCP news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x