17 April 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

राणेंच्या पनवतीमुळेच फडणवीसांची सत्ता गेली: खासदार विनायक राऊत

MP Narayan Rane, MP Vinayak Raut, Chief Minister Uddhav Thackeray

रत्नागिरी: खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय दरी सर्वश्रुत आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांचा ट्विटरवर पोस्ट टाकून हल्ला करण्याचा एककलमी कार्य्रक्रम सुरु आहे. त्यात खासदार नारायणे यांनी देखील भर टाकण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर देखील भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार या आशेने नव्याने स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विसर्जित करुण टाकला. त्यात कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कणकवलीच्या बाहेर ताकद दाखवणं शक्य न झाल्याने सध्या खासदार राणे देखील संतापल्याचे दिसत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यालाच अनुसरून शिवसेनेने देखील नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या पनवतीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय गाडी घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं”, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

“ज्याने माणसाने आयुष्यभर ठेकेदारी केली. राजकीय पदाचा फायदा घेत दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांच्या कृपेने मिळाले. त्या नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसं फसवलं, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळ सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नाही.” असा राजकीय टोला देखील राऊतांनी राणेंना लगावला आहे.

“नारायण राणेंना त्यांची जागा कोकणातील जनतेने दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी वनवासात जावं आणि शेवटचं आयुष्य हरि नामामध्ये मार्गक्रमण करावे.” असेही ते म्हणाले. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला कोणतीही बाधा होणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार हे एक आदर्श सरकार बनेल. त्याचे अनुकरण आतापासून अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही त्या सरकारकडे अभिमानाने पाहतो आहे.” असे देखील शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.

 

Former CM Devendra Fadnavis Unable to Form Government in Maharashtra because of MP Narayan Rane said Shivsena MP Vinayak Raut

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या