सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ४ ऑक्टोबर पर्यंत आहे. नितेश राणे हे कणकवली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पुढील दोन दिवसांत अर्ज भरावा लागणार आहे. तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघातून नारायण राणे निवडणूक लढविणार का? हे देखील २ ऑक्टोबरला स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. राणे सध्या भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. मात्र राज्यसभेत त्यांचे मन रमलेले नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यास इच्छूक आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे २ ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीला आमदार नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये २ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यानंतर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात कमालीचे बदल झाले आहेत. त्यापूर्वी २५ ते ३० जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरणाऱ्या नारायण राणे यांना कुडाळ-मालवण मतदार संघातून पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवसेनेने २००४ नंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात तीन पैकी दोन जागा मिळवून आपला भगवा फडकविला होता. नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील ९ वर्षे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. मात्र, २०१४च्या निवडणुकीत केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघ तेवढा काँग्रेसकडे राहिला आणि उर्वरित कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदारसंघ सेनेने पुन्हा मिळविले. त्यामुळे राणेंनी एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी तब्बल ९ वर्षे संघर्ष करावा लागला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON