23 February 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | मातोश्रीवरचा चप्पलचोर | भाषा बदल नाहीतर जिथे दिसाल तिथे फटकावीन - निलेश राणे

Former MP Nilesh Rane, Shivsena, MP Vinayak Raut

मुंबई, ०९ फेब्रुवारी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली. (Former MP Nilesh Rane rightsized Shivsena MP Vinayak Raut)

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटली. तसेच अमित शाह हे विश्वासघातकी व्यक्ती आहेत, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओत माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा अक्षरश: शेलक्या शब्दांत उद्धार केला आहे.

विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis’s stubbornness broke the Shiv Sena-Bharatiya Janata Party alliance. Also, Amit Shah is a traitor, said MP Vinayak Raut. Former MP Nilesh Rane has responded to this criticism by tweeting a video. In this video, former MP Nilesh Rane has literally rescued Vinayak Raut in shellac words.

News English Title: Former MP Nilesh Rane slams Shivsena MP Vinayak Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x