22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान | पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट

Konkan

मुंबई, ०८ सप्टेंबर | गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना चाकरमान्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान, पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट – Konkan Chakarmanee returning to Mumbai from Konkan will undergo RTPCR test :

कोरोनाचा प्रसार:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्बंधांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईसह कोकणात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चार ते पाच लाखाहून अधिक मुंबईकर चाकरमानी ट्रेन, एसटी, खासगी वाहनांनी कोकणात जातात. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रसार असल्याने उत्सव आणि सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. कोकणात कोरोनासह नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही प्रसार आहे. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण हे जळगाव, रत्नागिरी तसेच मुंबईत आढळून आले आहेत.

कोकणात आरटीपीसीआर टेस्ट:
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे, लस घेतली नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे अन्यथा कोकणात रेल्वे स्टेशन, एसटी डेपो आदी ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

मुंबईत परतताना होणार टेस्ट:
मुंबईहून कोकणात गेलेला चाकरमानी पुढील पाच ते दहा दिवस कोकणातील नागरिकांच्या संपर्कात येणार आहे. त्यानंतर हा चाकरमानी मुंबईत परतणार आहे. अशावेळी चाकरमानी मुंबईत येताना त्यांना कोरोना किंवा डेल्टा प्लसची लागण झाली आहे का याची चाचणी रेल्वे स्थानक, एसटी डेपो तसेच मुंबईच्या इन्ट्री पॉईंटवर केली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

संपर्कात येणाऱ्यांच्या पहिल्या दिवशी टेस्ट:
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या पाच दिवसांनी चाचण्या केल्या जायच्या. या नियमात बदल केले जाणार असून आता पहिल्या आणि पाचव्या दिवशी चाचण्या केल्या जाणार आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Konkani Chakarmanee returning to Mumbai from Konkan will undergo RTPCR test.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x