5 February 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
x

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण...

Anil Parab

मुंबई, ०४ ऑगस्ट | रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती.

दरम्यान, चेक परत घेण्यात आल्याचं वृत्त खरं असल्याचं खुद्द पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, दिलेले चेक परत घेण्याचं कारण वेगळं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील याला दुजोरा दिला असून प्रसारमाध्यमातून प्रसारित केले जाणारे वृत्त सत्य परिस्थितीला धरून नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लाभार्थ्यांच्या विनंतीवरून घेतला निर्णय, पण चुकीची बातमी पसरली::
या मुद्द्यावर स्थानिक जिल्हा प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. चेक वाटपाबाबत चुकीची बातमी पसरली होती. खेडमधल्या पोसरेमधील चार मयतांच्या वारसांना चेकचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याचा तपशील वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यांची बँक ३० किलोमीटर लांब असल्यामुळे त्यांचे चेक घेऊन पैसे थेट बँकेत जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या विनंतीनुसार मदत करण्यासाठी संबंधित तलाठ्यांनी चेक परत घेतले होते. सध्या सर्व चेक बँकेत जमा झाले आहेत”, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Anil Parab clarifies on Ratnagiri Posare case flood affected people cheques Taken Back By Government news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x