14 January 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु | ते २२४ गुजराती-मारवाडी रडारवर

Nanar Project, Land Purchase, Investigation

रत्नागिरी, १५ मार्च: कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे. या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे. (Movements have also started to return the lands taken for the Nanar refinery)

त्यानुसार ३१ मार्चपर्यंत भूमिपुत्रांकडून निवेदन आणि तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. नाणारसह १४ गावांमध्ये जमीन विक्रीचे कोट्यावधींचे व्यवहार झाले होते. यावेळी परप्रांतीयांनी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील जमीन खरेदी विक्री प्रकरणाच्या चौकशीचे अधिकृत आदेश दिले होते.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे खरेदी व्यवहार झाले होते, ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते. नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी ७ लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या आहेत. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य ९० लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. २२४ गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती.

 

News English Summary: The probe into the land deal for the Nanar refinery project in Konkan has begun amid opposition demands. Movements have also started to return the lands taken for the refinery. A cell has been set up at the Talathi office along with the Rajapur provincial office to investigate the Nanar refinery project.

News English Title: Movements have also started to return the lands taken for the Nanar refinery news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x