24 December 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर

Sharad Pawar, Konkan Tour, Nature Cyclone

मुंबई, ९ जून: ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.

शरद पवार यांनी सकाळी माणगाव, मोरबा म्हसळा या गावांना भेट दिलं. माणगावमध्ये बाजारपेठ, मोरबा येथे गावकऱ्याची विचारपूस केली. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानाची पाहाणी केली. या दरम्यान, शरद पवार यांनी मोरबा येथील मदरशाला भेट दिली.

चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. शरद पवार या दौऱ्यात माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथे भेट देणार आहेत. श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर ३ महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावं असं वाटलं. दुसरीकडे आता ४ दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच या सरकारला नुकसानीचा अंदाजच आलेला नाही, असाही आरोप केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “निसर्ग चक्रीवादळानंतरचा पहिला प्रवास भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा झाला. त्यानंतर ३ महिने मातोश्रीबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटलं आपणही जावं. त्यांचा २-३ तासाचा प्रवास झाला. आता ४ दिवसांनंतर शरद पवार यांनाही वाटलं आपणही गेलं पाहिजे. पहिला प्रवास तर काही तासातच प्रवीण दरेकर यांनी केला. मात्र, कालपासून कोकणाशी संबंधित भाजपचे सर्व आमदार काम करत आहेत. ते रत्नागिरी, रायगड या भागात प्रवास करत आहेत. केवळ प्रवास करुन आम्ही थांबलो नाही, तर आज १६ ट्रक साहित्य कोकणात पाठवले आहे. यात पत्रे ताडपत्री यांचा समावेश आहे. तेथील सर्व छपरं उडाली आहेत.”

 

News English Summary: NCP President Sharad Pawar is on a two-day visit to Konkan from Tuesday to inspect the damage caused by Hurricane ‘Nature’. Raigad district has suffered the most damage due to the cyclone.

News English Title: NCP Chief Sharad Pawar visit Konkan assess damages due to cyclone Nisarga News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x