महाड तळिये दुर्घटना | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पहिला टेम्पो महाडच्या दिशेने
मुंबई, २४ जुलै | राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.
ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त लेाकांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबंधित गावाची पाहणी करणार आहेत. ते गावातील लोकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने महाडला रवाना झाले आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांकडून देखील मदतकार्य सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. ‘राष्ट्रवादी आपल्यासोबत’ या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे. खालापूरवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मदतीचा टेम्पो महाडच्या दिशेने पाठवला. राज्याचा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत असताना आपल्या मदतीची त्यांना गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी मदतीचा टेम्पो महाडकडे पाठवला.
धान्य, कपडे, ब्लँकेट, औषध, सॅनेटरी, फुड पॅकेट्स, बिस्किट, दूध, मिनरल वॉटर अशी मदत पाठवण्यात आलेली आहे. महाडमध्ये गेल्यानंतर स्थानिक सांगतील त्या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाईल, असं राष्ट्रवादी युवक काँँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP party helping hands first tempo sent to Mahad for disaster affected people news updates.
ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करा. Click Here to Download
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN