20 April 2025 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

पंपाने नव्हे तर 'घुशींनी पोखरल्याने साचलेलं पाणी समुद्रात गेलं; नेटकऱ्यांकडून सरकारची खिल्ली

Tivare Dam, Chiplun, Ratnagiri, Yuti Sarkar, Minister tanaji Sawant, sadanand chavan, Shivsena, BJP, Congress, NCP, MNS

चिपळूण : तिवरे धरण फुटल्यानंतर अनेकांनी आपला जीव गमावला असून सरकारच्या निष्काळजीपणावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गावकऱ्यांनी सरकारला आधीच याबाबत कल्पना दिली होती आणि तरी देखील सरकारी यंत्रणेने त्यावर पूर्णपणे डोळेझाक केली होती. प्रसार माध्यमांनी देखील सरकारला एका दिवसापुरता फैलावर घेतल्याचे दिसत असून आगमी विधानसभा निवडणुका हे त्यामागील कारण असावे असं म्हटलं जातं आहे.

दरम्यान सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी त्या धरणाचं बांधकाम शिवसेनेच्या कॉन्ट्रॅक्टर आमदाराच्या कंपनीनेच केले होते हे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्या बचावासाठी त्या धरणाच्या अपघाती भागात दौऱ्यावर जाणारे सत्ताधारी नेते गावकऱ्यांनी दिलेल्या कारणांचा वेगळाच संदर्भ जोडून मूळ घटनेपासून स्वतःला क्लीनचित देण्याची योजना आखात आहे असंच म्हणावं लागेल.

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. वास्तविक हे तेच मंत्री आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राला भिकेला लावेन असं वक्तव्य केलं होते आणि सेनेने त्यांना मंत्रिपद दिलं. त्यामुळे त्यांच्याकडून असेच निष्कर्ष येणं अपेक्षित आहे.

चिपळूणमधलं तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारं हे वक्तव्य आहे. खेकड्यांनी धरण फोडलं असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. २००० साली हे धरण बांधून पूर्ण झालं. मागच्या १५-१६ वर्षांपासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं तेव्हा तक्रार करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अशात आता जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी मात्र खेकड्यांनी भोकं पाडल्याने तिवरे धरण फुटलं असा अजब दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अजब दावा केला आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे.

मात्र मंत्री महाशयांच्या या विधानावरून नेटिझन्सनी मात्र समाज माध्यमांवर सरकारला झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण देण्यात सरकार चलाख असल्याने नेटिझन्सनी त्यांची चलाखी त्याच्यावरच उलटलेली आहे. जर संधारणासारखा भव्य विषय खेकड्यांमुळे नेस्तनाबूत होऊ शकतो आणि खेकड्यांनी धरण पोखरल्याने ते फुटू शकतं, तर सत्तेत असलेली शिवसेना मुंबईकरांना मुंबई पावसाळ्यात तुंबल्यावर कारणं देत पालिकेने केलेल्या अत्याधुनिक पंपामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने पाणी समुद्रत सोडून दिल्याने शहरावरचं संकट टळलं असं सांगत असते. मात्र हीच मुंबई महानगर पालिका शहरातील उंदरांच्या बंदोबस्तासाठी अनेक टेंडर काढत असते, मात्र उंदीर अजून तसेच आहेत. मग उद्या मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला त्याच्या प्रतिक्रियेवर असं उत्तर दिलं की ‘घुशींनी पोखरल्याने साचलेलं पाणी समुद्रात गेलं’ तर वावगं ठरणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या