23 February 2025 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोकणी लोकांसाठी राणेंचा पुढाकार | फडणवीसांच्या हस्ते अत्याधुनिक कोविड-१९ लॅबचे लोकार्पण

Opposition Leader Devendra Fadnavis, Inaugurated Covid 19, lab at Life Time Hospital

कणकवली, १० ऑगस्ट : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे कसाल येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कोविड 19 लॅबचे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संबोधित केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कोकणी माणसाच्या मदतीला सदैव तत्पर असणारे राणे कुटुंबीय कोरोना आपत्तीत देखील स्थानिक लोकांच्या अडचणी समजून घेऊन योग्य निर्णय घेताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आल्याने इतर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याची पुन्हा भाजपावासी झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे , विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीआधीच खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. मागील ३५ वर्षे सातत्याने सहकार क्षेत्रात गुलाबराव कार्यरत आहेत आणि सहकारमहर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून गुलाबराव यांची आहे ओळख आहे. मालवण येथील राणेंच्या निलरत्न बंगल्यावर त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. गुलाबराव चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, अशोक सावंत, वैभववाडी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांची होती प्रमुख उपस्थिती होती.

 

News English Summary: Opposition Leader Devendra Fadnavis inaugurated a state-of-the-art Covid 19 lab at Life Time Hospital at Padve Kasal run by former Chief Minister and current MP Narayan Rane’s Sindhudurg Shikshan Prasarak Mandal. A large crowd was present at this time.

News English Title: Opposition Leader Devendra Fadnavis inaugurated a state of the art Covid 19 lab at Life Time Hospital News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x