महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्र्यांच्या समोरच नाराज आ. भास्कर जाधवांनी सेना खासदाराचा हात झटकला
‘ज्या शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आले हा एक चमत्कार आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उमरठ, पोलादपूर येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला.
5 वर्षांपूर्वी -
नाणार जाहिरात: जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही: निलेश राणे
सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा जाहिरातमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामना जाहिरातीत नाणार'चा उदोउदो! फसव्या भूमिकेतील शिवसेना पकडली गेल्याची चर्चा
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात आघाडी उघडत मते मिळवणाऱ्या शिवसेनेची नाणारवरून कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामनात’च नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातच ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या जाहिरातीमुळे शिवसेना स्वतःच स्वतःच्या सापळ्यात अडकली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्यासारखा वाघ ह्या खोटारड्या अन शेंबड्या ठाकरे सरकार'मध्ये शोभत नाही: निलेश राणे
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीची सत्ता आहे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मिटवून टाकाच: आ. नितेश राणे
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीने थकवल्याने उद्धव ठाकरे सुट्टीवर: आ. नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली आहे. “हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. ६० दिवसात काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे. त्यामुळेच ते ३ दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात.
5 वर्षांपूर्वी -
३ महिन्यातच उद्धव ठाकरे सुट्टीवर; काय मोठा पराक्रम केला म्हणून सुट्टी? - निलेश राणे
मिनी काश्मीर म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे तीन दिवसाच्या खाजगी दौर्यावर जातायेत. त्यासाठी महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असुन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर मध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री ३ दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात: आ. नितेश राणे
‘राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेली नवी भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेशी अशीच आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना समाधान देणारी आहे. राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय,’ अशी सूचक प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकण: उत्तर भारतीयांच्या कोकणात सत्यनारायणाच्या पूजा आणि उद्या छटपूजा?
उत्तर भारतीय समाज सर्वत्र पसरतो आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांपुरता मर्यादित असणारा समाज सध्या कोकणात देखील मोठया प्रमाणावर स्थिरावतो आहे. विशेष म्हणजे हा समाज एकत्र येऊन आज स्वतःच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. आज तरी या फलकांवर कोणत्याही पक्षाचं नाव असलं तरी त्यांच्यातीलच काही लोकं प्रतिनिधी म्हणून उभे केले जातील आणि नंतर ते थेट स्वतःला एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासोबत जोडून राजकीय फायदा उचलण्यास सज्ज होतील अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज: नारायण राणे
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
राज्याचे प्रशासनच माहिती नाही अशा माणसाच्या हातात सत्ता: नारायण राणे
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. ‘या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सरकारला सिरीयस बेस नाही. राज्याचे प्रशासन माहिती नाही. विकास माहिती नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची?’ असा बोचरा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लांजा नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेला स्पष्ट बहुमत
लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निकालामध्ये शिवसेनेने बाजी मारली असून यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून मनोहर बाईत हे निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी विजय मिळवला. लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगर पंचायतीत भगवा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी झाले असून नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवलं. १७ नगरसेवकांपैंकी ९ नगरसेवक शिवसेनेचे विजयी झाले आहेत. तर भाजप ३, आघाडी १, अपक्ष ४ नगरसेवक विजयी झालेत.
5 वर्षांपूर्वी -
निलेश राणे रामदास कदमांना म्हणाले, आज तुम्हाला शिवी घालणार नाही!
“रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला धूळ चारत भाजपने असा जल्लोष केला
एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला . या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
नगराध्यक्षपद: राणे कुटुंबियांवर टीका करून मंत्रिपद मिळवणाऱ्या केसरकारांना भाजपचा दणका
एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता आपल्या चुकीमुळे नाही तर शिवसेनेच्या गद्दारीमुळे गेली: खा. नारायण राणे
स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी वेळी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतलेल्या अत्याचारग्रस्त लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देणारे नागरिकता विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले. मात्र, या वेळी शिवसेनेची भूमिका ही धरसोड राहिली. हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा खरा मुखवटा यावेळी उघड झाला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केली. खरे म्हणजे, शिवसेना हा मुखवटा नसलेला पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ब्रिटिशांची ४ वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांचे आदर्श होऊ शकत नाहीत; भाजप आ. राणेंचं ते ट्विट
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणेंच्या पनवतीमुळेच फडणवीसांची सत्ता गेली: खासदार विनायक राऊत
खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय दरी सर्वश्रुत आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांचा ट्विटरवर पोस्ट टाकून हल्ला करण्याचा एककलमी कार्य्रक्रम सुरु आहे. त्यात खासदार नारायणे यांनी देखील भर टाकण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे उद्धव ठाकरेंना वांद्रयात जाऊन उत्तर देणार होते; मग गाडी अडली कुठे?
लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटलं होतं. नारायण राणे यांना शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधील प्रचारादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला मोठं तोंड फोडलं होतं आणि त्यानंतर खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं होतं. कारण उद्धव ठाकरे यांनी थेट कोकणात सभा घेऊन नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना जमलं नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं; नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात विविध आंदोलनामुळे चर्चेत होता. स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी मात्र स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नाणारवासियांवर गुन्हे दाखल केल्याने कोकणात भारतीय जनता पक्षाबद्दल खदखद होती आणि त्याची झळ थेट युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला देखील बसली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC