महत्वाच्या बातम्या
-
तिवरे धरणफुटी: कोकणचे नेते असून देखील मंत्री विनोद तावडे तिकडे फिरकलेच नाहीत
तीन दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
निर्लज्ज युती सरकार! भरपाईसाठी धरणफुटीत वाहून गेलेल्या वस्तूंची बीलं दाखवा, अन्यथा!
तिवरे धरणाच्या दुर्घटनेत तब्बल १९ गावकऱ्यांचा जीव गेला असून त्यांचे कुटुंबीय प्रचंड दुःखात आहेत. अनेकांचे तेर अजून शव देखील मिळालेले नाहीत. सरकारने देखील संबधित मंत्र्यांना या ठिकाणी धाडले खरे मात्र त्यांनी देखील वरचेवर गावकऱ्यांशी चर्चा करून आणि त्यानंतर सरकारी विश्राम गृहात बसून स्वतःच्या अकलेचे तारे तोडून धरण खेकड्यानी तोडल्याचा जावईशोध लावला.
6 वर्षांपूर्वी -
रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी? मनसे
साध्याच युती सरकार हे अधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांना वाचवण्याच्या उद्देशाने उंदीर खेकडे यांना दोषी ठरविण्याचे हास्यास्पद प्रकार करता आणि त्यामुळे सरकारवर चोहोबाजूने टीका करण्यात येते आहे. दरम्यान गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अशातच नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कामचुकार अधिकाऱ्यावर चिखलफेकीमुळे तुरुंगवास; १८ मृतदेह चिखलात मिळून देखील दोषी मोकाट
तीन दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
गावकऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती, ते सरकारच्या भोंगळ कारभाराचे बळी
चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.
6 वर्षांपूर्वी -
पंपाने नव्हे तर 'घुशींनी पोखरल्याने साचलेलं पाणी समुद्रात गेलं; नेटकऱ्यांकडून सरकारची खिल्ली
तिवरे धरण फुटल्यानंतर अनेकांनी आपला जीव गमावला असून सरकारच्या निष्काळजीपणावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जावोत आहे. दरम्यान गावकऱ्यांनी सरकारला आधीच याबाबत कल्पना दिली होती आणि तरी देखील सरकारी यंत्रणेने त्यावर पूर्णपणे डोळेझाक केली होती. प्रसार माध्यमांनी देखील सरकारला एका दिवसापुरता फैलावर घेतल्याचे दिसत असून आगमी विधानसभा निवडणुका हे त्यामागील कारण असावे असं म्हटलं जातं आहे.
6 वर्षांपूर्वी -
तिवरे धरणाचे ठेकेदार सेना आमदार सदानंद चव्हाणांविरुद्ध गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे खेमराज कन्ट्रशन कंपनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या बंधूची आहे. धरणाला लागलेल्या गळतीप्रकरणी आता खेमराज कन्ट्रक्शन कंपनी जवाबदार असल्याचे आरोप होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
फुटण्याच्या अवस्थेतील धरणांच्या ऑडिट'पेक्षा जलसंपदा मंत्री पक्ष फोडाफोडीत व्यस्त राहिल्यावर काय होणार?
आजची घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिकांनी अनेक तक्रारी देखील दिल्या आहेत. मात्र अशा दयनीय अवस्थेतील धरणांचे ऑडिट करण्याचे जलसंपदा मंत्री यांना कधीच मनात आले नसावे, कारण त्याच्या या मंत्रिपदाचा बराच कार्यकाळ हा स्वतःला भाजपचे संकटमोचक बनविण्यात आणि इतर पक्षातील नेतेमंडळी फोडण्यात वाया गेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चिपळूण: तिवरे धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली; २३ जण बेपत्ता
मागील ४ दिवस कोकणात देखील अतिवृष्टीने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून संबंधित वाडीतील तब्बल २३ जण वाहून गेल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. वृत्त पसरताच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. पावसाच्या प्रमाणाने मर्यादा गाठली तर संबंधित धरण फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात तेलशुद्धीकरण प्रकल्प नको म्हणणारी सेना पुन्हा पलटली? रायगड जिल्हा कोकणात नाही का?
लोकसभा निवडणुकीत नाणार’मधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणच्या निसर्गाला हानिकारक असून शिवसेनेचा अशा प्रकल्पना विरोध असून असे प्रकल्प येऊ देणार नाही असं म्हणणारी शिवसेना लोकसभा निवडणूक संपताच आणि रायगडमधून अनंत गीते पराभूत होताच, पडद्याआडून वेगळ्याच हालचाली सूर झाल्या आहेत. सदर प्रकल्प हा कित्त्येक लाख करोड रुपयांचा असल्याने शिवसेनेला शांत करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु झाल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ऊ.ठा'सारखे मावळे असते तर ते कधीच यशस्वी झाले नसते
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांनी आरक्षण वैध ठरल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. दरम्यान त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा-मराठेतर वाद विसरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. मात्र उद्धव ठाकरेंचा हा प्रयोग म्हणजे विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी केलेला खटाटोप अशी जोरदार चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. ज्यावर आता नीलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून बोचरी टीका टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने उद्धव ठाकरेंनी असे वक्तव्य केले. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर तर महाराज कधीच यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून खाली फेकले असते अशी खोचक टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणुक: कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी
आज राज्यातील अनेक नगरपरिषदेतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी झाले आहेत. सदर निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचं पाहायल मिळालं, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ ६ मतांच्या फरकाने मनसेचे उमेदवार बाळकृष्ण शंकर ठाकुर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय प्राप्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
BSNLने सिंधुदुर्गला ४-जी सेवेतून वगळले; अपयशी ठरताच विनायक राऊतांकडून भलतीच अफवा
आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःच्या अडाणीपणामुळे कुप्रसिद्ध असलेले रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपला अडाणीपणा मागील पानावरुन पुढे चालू केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेली BSNLची ४ जी सेवा सिंधुदुर्गात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर आता राऊत यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोड्ड्ण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, अशी अजब कारणं पुढे रेटली आहेत. त्यांच्या या “थोर” विचारांमुळे कोकणात युवापिढी राऊत यांना लाखोल्या वाहत आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत
भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांनी सेनेला मतं दिली; आता सेना नेत्यांची मुलं मराठी उद्योजकांकडून खंडण्या मागत आहेत
लोकसभा निवडणुकीत मतदाराने भाजपसोबत शिवसेनेच्या खासदारांना देखील कोणताही कर्तृत्व नसताना भरभरून मतदान केलं. मात्र आता त्याच मतदारांकडून शिवसेनेच्या आमदारांची मुलं खंडण्या मागत असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव आहे. मुंबईतीली भांडुप येथील वाहतूक व्यावसायिक राजेश शेटकर यांच्याकडे महाड एमआयडीसीत व्यावसाय करण्यासाठी विकास गोगावले यांनी खंडणीसाठी राजेश यांना धमकावल्याचा आरोप आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: हायवेच्या कामांची पोलखोल, गडकरी कंत्राटदारांना बुलडोझर खाली चिरडनार का?
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
जयघोषाने रायगड दुमदुमला! किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा
स्वराज्याची राजधानी रायगडात किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने रायगडावर हजेरी लावली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पहाटेच रायगडावर हजेरी लावून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. ते रोप वेने याठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे यंदा शेतकरी बांधवांना अभिषेकचा मान देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाची हजेरी! वीज, टेलिफोन सेवा खंडित
कोकणाची आज पहाट झाली ती जोरदार पावसाने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या बळीराजाने पेरणीची कामेदेखील सुरू केली आहेत. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल, विदर्भ-मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण मसुरे: बेकायदेशीररीत्या वाळू उपसामुळे नद्यांचं अस्तित्व धोक्यात; सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा
कोकणातील अनेक गावं अशी आहेत ज्यांचं सौंदर्य डोळ्यात साठविण्यासारखं आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच येथील अवैध्य वाळू उपसा प्रकरणात हितसंबंध गुंतलेले असल्याने येथील नद्या आणि निसर्ग धोक्यात आले आहेत. त्यातीलच एकप्रकार म्हणजे कालावल खाडीपात्रातील मसुरे बांदिवडे डी ३ या क्षेत्रात वाळू उपशासाठी ७ जूनपर्यंतची मुदत असल्याने येथील मंजूर पासचा वापर करून तालुक्यात अन्य ठिकाणी बेकायदेशीररीत्या वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल