महत्वाच्या बातम्या
-
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी -
नाणारप्रश्नी सुभाष देसाईंना प्रेझेटेंशन दिलेल, त्यामुळेच भूसंपादनाची अधिसूचना काढली होती: मुख्यमंत्री
सध्या नागपूर पावसाळी अधिवेशनात नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संपूर्ण सभागृहाच या मुद्यावरून पेटलं असताना सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काल नाणार आंदोलकांशी शिवसेनेच्या आमदारांशी बाचाबाची झाली होते. त्यावरून कोकणवासीयांमध्ये शिवसेने’प्रती वाढत असलेली नाराजी समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नागपुरात आंदोलक नाणारवासियांची शिवसेना आमदारांशी बाचाबाची
नागूपर पावसाळी अधिवेशन सध्या रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे गाजत आहे. सभागृत सुद्धा धुमशान पाहावयास मिळत आहे. दरम्यान कोकणातून थेट नागपुरात दाखल झालेल्या नाणार आंदोलकांसोबत शिवसेना नेत्यांशी बाचाबाची झाल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ते विमान मनसेने स्वगृही परत आणले - व्हिडिओ व्हायरल
ते विमान मनसेने स्वगृही परत आणले – व्हिडिओ व्हायरल
7 वर्षांपूर्वी -
भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली
मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने नाणार'ला जाऊन अध्यादेश रद्द केल्याचे सांगितले, मग करार कसा झाला? राष्ट्रवादी
आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल करत पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचा करार सुद्धा झाला, आता पुन्हा 'मी मंत्रिपद सोडेन'
स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा नाणार प्रकल्प लादण्यात आला आहे. नाणार मध्ये सभा घेऊन ‘मी नाणार संबंधित अध्यादेश रद्द करण्याची घोषणा करतो आहे’ अशी घोषणा करणारे राज्याचे उद्यीगमंत्री सुभाष देसाईंना दिल्लीत पारपडलेल्या घडामोडीं विषयी विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपद सोडून राजीनामा देईन असा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पावर स्वाक्षऱ्या, निसर्गप्रेमी कोकणी लोकांमध्ये सेना-भाजप सरकार विरुद्ध संतापाची लाट येण्याची शक्यता
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. परंतु कोकणी माणसाचा तीव्र विरोध डावलून हुकूमशाही पद्धतीने हा प्रकल्प अखेर कोकणावर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे कोकणात विद्यमान आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री असताना सुद्धा या प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाबाबत चिडीचूप असणारे शिवसैनिक, आज इतरांना पर्यावरण व प्रदूषणाचे धडे का देत आहेत? सविस्तर
काल संपूर्ण महाराष्ट्रात प्लस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. वास्तविक प्लास्टिक बंदीला कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही. निसर्गाला आणि प्रभूषणाला विशेष करून जल प्रदूषणाला कारणीभूत असणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे प्लास्टिक हाच आहे. प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्था ही आपल्याकडे उपलब्ध तरी होती का हा प्रश्नच आहे. पण एक विषय प्रकर्षाने समोर आला तो म्हणजे निसर्गरम्य कोकणातील विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि त्या प्रकल्पामुळे भविष्यात कोकणातील समुद्र, नद्या, शेतजमीन, जल संपत्तीवर कोणते दूरगामी परिणाम होतील या बद्दल कोणतीही वाच्यता न करणारे शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्राला समाज माध्यमांवर निसर्ग आणि पर्यावरणाचे धडे देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनसेने पूर्ण केलेलं खेड'वासियांच स्वप्नं शिवसेनेने पळवलं
राजकारणाच्या आखाड्यात उमेदवार पळावा पळावी काही नवीन विषय नाही. त्यात शिवसेनेने सध्या पदवी मिळवली आहे असच म्हणावं लागेल. त्यात ते मनसे संबंधित असेल तर त्यांना अधिक आनंद होतो. मागे भाजपने मुंबईतील एक नगरसेवक पदाची पोटनिवडणूक जिंकताच भाजपच्या नेत्यांनी लगेच आमचा महापौर मुंबई महापालिकेत बसविणार अशी हूल देताच बिथरलेल्या सेनेने भाजपचे नगरसेवक फोडता येणार नाहीत हे ध्यानात येताच स्वतःची अर्थशक्ती वापरून मनसेचे ६ नगरसेवक गळाला लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली, परंतु सामान्यांकडून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर
ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेना सरकारच्या मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांना स्थान नाही
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाण यांची हद्दच अजून निश्चित नसल्याने भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने आखलेल्या मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात मुंबईमधील एकाही कोळीवाड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. एकूणच परिस्थिती अशी आहे की वरळी कोळीवाड्यानंतर आता सायन कोळीवाड्याला सुद्धा झोपडपट्टी घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत असं चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नाणार प्रकल्पाविरोधात विराट मोर्चा
नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात विराट मोर्चा काढला. यात नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले सर्व स्थानिक लोक सहभागी झाले होते.
7 वर्षांपूर्वी -
कदमांनी मला पाडण्याचा व संपविण्याचा विडा उचलला होता: अनंत गीते
शिवसेनेतील जुनी खदखद चव्हाट्यावर आली आहे. औरंगाबाद येथे औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात आणि व्यासपीठावर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आणि महिला अध्यक्ष मनीषा कायंदे उपस्थित असताना केंद्रीय मंत्री वसंत गीते यांनी ही जुनी आठवण करून दिली.
7 वर्षांपूर्वी -
केवळ मराठीच भावनिक राजकारण, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
सध्याची शिवसेना ही पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. केवळ मराठीच्या नावाने भावनिक राजकारण करायचा पण त्यांच्यासाठी शिवसेनेकडून काही सुद्धा केले जात नाही हे वास्तव आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन केली आहे. यांनी मराठी माणसासाठी कधीच काही केलं नाही, त्यामुळे यांच्या कार्यकाळातच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असं ते टीका करताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
आज नारायण राणे 'मातोश्री'वरील भेटीगाठींवर भाष्य करतील
कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL