महत्वाच्या बातम्या
-
Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर राणे ३ नंबरला | विनायक राऊत म्हणाले..
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण (Chipi Airport Inauguration) पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याचं वृत्त आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणेंचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेने राणेंवर निशाणा साधलाय. शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केलीय. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरु ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं”, असा निशाणा खासदार विनायक राऊत यांनी साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Cyclone Gulab | मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता | पुढील ४८ तास महत्त्वाचे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ (Cyclone Gulab) निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून महाविकास आघाडीत 'राजकीय तेल' ओतणारी प्रतिक्रिया
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
Ramdas Kadam Vs Vaibhav Khedekar | कोणत्याही परिस्थितीत वैभव खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य वैफल्याग्रस्तातून | सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर
काल शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्तातून अनंत गीते यांचे वक्तव्या आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणूनक गळून पडला असून नैराशेतून त्यांचे हे वक्तव्य आले असल्याचेही तटकरे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
वैभव खेडेकर मनसेचे कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? | खेड नगरपरिषदेत इंधन घोटाळा कोणी केला? - रामदास कदम
वैभव खेडेकर मनसेचे पक्षाचे आहेत कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे त्यांच्या आरोपाना आपण भीक घालत नाही असा पलटवार माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दि. १८ रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत असे कदम यांच्या म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या मार्फत अनिल परब यांच्याबाबतची माहिती सोमैयांना दिली - वैभव खेडेकर
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यानेही हात घालताना शिवसेना नेत्यासंदर्भातच एक दावा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकण तौत्के, निसर्गवादळ आणि अतिवृष्टी | कोकणला 3 हजार कोटी | राज्य सरकारचा मोठा निर्णय
तौत्के, निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे प्राण गेले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. राज्य सरकारने चक्रीवादळांचा बंदोबस्त तसेच कायमस्वरुपी उपायोजना करण्यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार? | कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढत देणार
कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती.
3 वर्षांपूर्वी -
कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला | पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट
मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळ उद्घाटन | मुख्यमंत्री आले तर स्वागत करू - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आले तर स्वागत करू असा पवित्र घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात | राऊतांच्या टोला
कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंच - देवेंद्र फडणवीस
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बेळगावचा निकाल म्हणजे मराठी माणसाचा विजय असून हा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटल आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पत्रकरांसोबत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान | पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना चाकरमान्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार | राणे आणि शिवसेनेकडून पुन्हा इशारे सुरु
कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय.
3 वर्षांपूर्वी -
Alert | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात याच काळात शेकडोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई आणि अन्य भागातून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार असूनही ट्रेन सोडू शकतो | तर कोकणी जनतेने विचार करावा - नितेश राणे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं.
3 वर्षांपूर्वी -
चाकरमानी कोकणात निघाला | तिकडे दापोलीसहित अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात
दापोलीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही | कागदाचं विमान उडवणार का? - आ. नितेश राणे
चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
3 वर्षांपूर्वी -
सोमैयांच्या मागणीप्रमाणे राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं? | आ. वैभव नाईक यांचा सवाल
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावरील ईडी चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार