5 February 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
x

कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?

Konkan Railway Corporation Ltd Recruitment 2021

रत्नागिरी, २८ ऑगस्ट | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर संबंधित प्रकल्प किंवा ती मालमत्ता खाजगी कंपनीकडे जाईल आणि त्या प्रकल्पांची पुनर्बांधणी किंवा विकास या दोन्ही गोष्टी संबंधित खाजगी कंपनीला करता येणार आहेत.

कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का, मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ? – Privatization of Konkan Railway :

या उपक्रमांतर्गत देशातील अनेक विमानतळे, शेकडो किलमोटरचे रस्ते अनेक सरकारी इमारती त्याचबरोबर देशातील रेल्वे देखील खाजगी कंपनीच्या हातात जाणार आहे. यातच नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन उपक्रमात कोकण रेल्वेचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गाचा सुमारे 756 किलोमीटर अंतराचा मार्ग सरकार खाजगी कंपनीला हस्तांतरित करणार आहे, ज्यामधून सरकार 7281 कोटी रुपये उभा करणार आहे. कोकण रेल्वेतील 69 स्थानकांचा ताबा आता खाजगी कंपन्यांकडे जाणार आहे.

नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन या योजनेत रस्त्यांपाठोपाठ रेल्वे हे सर्वांत मोठे क्षेत्र असणार आहे. या NMP योजनेद्वारे 741 किलोमीटर लांबीची कोकण रेल्वे खाजगी कंपनीकडे देण्यात येणार आहे त्याशिवाय 400 रेल्वे स्टेशन,90 प्रवासी रेल्वेगाड्या, 15 रेल्वे स्टेडियम, निवडक रेल्वे कॉलनी, हे सारे रेल्वेचे प्रकल्प देशातील खाजगी कंपनीला देऊन मोदी सरकार येत्या 4 वर्षांमध्ये1.52 लाख कोटी रुपये कमाई करणार आहे.

जरी हे प्रकल्प खाजगी कंपन्यांना दिले तरी या मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील, मात्र त्यांना नफ्यात आणण्यासाठी त्या कंपन्या खाजगी क्षेत्रात दिल्या जातील. आणि नंतर त्या कंपन्या सरकारला परत देणार आहेत. नॅशनल मोनेटाइझेशन पाइपलाइन ही केंद्र सरकारची योजना आहे जी पुढील 4 वर्षांत सरकारी मालमत्तांमधून कमाई करेल. खाजगी क्षेत्र अशा अनेक पायाभूत सुविधा विकसित करेल आणि त्यावर अनेक वर्षे कमाई करेल. ठराविक वेळेनंतर ते ही मालमत्ता सरकारला परत करतील.असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाणी सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Privatization of Konkan Railway news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x