22 February 2025 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

निसर्गाचा प्रकोप | तळई गावाची लोकसंख्या 241 | त्यापैकी 109 व्यक्ती सुदैवाने गावाबाहेर होत्या

Raigad Taliye landslide

रायगड, २४ जुलै | कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.

तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघताय आमच्या नातेवाईक कधी बघायला मिळतील. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली.

महाडमधील तळई येथे दरड कोसळल्याच्या घटनेत 85 व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 44 मृतदेह आढळले आहेत. तर अद्यापही 41 व्यक्ती बेपत्ता आहेत. रायगड जिल्हा प्रशासनामार्फत ही माहिती देण्यात आली. तळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raigad landslide rescue operation still continue Taliye village news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x