18 November 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

चिपळूण: तिवरे धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली; २३ जण बेपत्ता

Ratnagiri Tivare Dam

रत्नागिरी : मागील ४ दिवस कोकणात देखील अतिवृष्टीने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून संबंधित वाडीतील तब्बल २३ जण वाहून गेल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. वृत्त पसरताच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. पावसाच्या प्रमाणाने मर्यादा गाठली तर संबंधित धरण फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील ४ दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकार यापुढे अजून कोणते मदत कार्य पोहोचवणार ते पाहावं लागणार आहे. मध्यंतरी चिपळूणमध्ये पुलासंबंधीत दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावला होता आणि त्यानंतर राज्य सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x