21 November 2024 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

दोस्तीत कुस्ती | नगरसेवकांनंतर एकमेकांचे प्रकल्प पळवापळवी | कोकणाविरुद्ध लातूरचे आतुर

Shivsena, Project in Sindhudurg, Hijacked by Minister Amit Deshmukh, MP Vinayak Raut

मुंबई, 06 ऑक्टोबर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकल्प पळवापळवीचं काम सुरु आहे. सिंधुदुर्गातील प्रकल्प काँग्रेसचे मंत्री पळवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी गावात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन रिसर्च प्रकल्प होत आहे. त्यासाठी एमआयडीसीने ६० एकर जागा देखील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला दिली आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग ऐवजी लातूरला व्हावा अशी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची इच्छा आहे. त्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील आहेत. यावरुन विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमित देशमुख यांनी स्वर्गीय वडिलांकडून काही गुण घ्यावेत, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.

केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. “आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत,” अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, “हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत. जर हा प्रकल्प कोण पळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडू.”

या प्रकल्पाचे अभिप्राय राज्य सरकारकडून मागितलेले आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवर तयारी झाली असताना तसंच अभिप्राय तयार झालेला असताना अचानकपणे हा प्रकल्प लातूरला तु्म्ही द्या, असं मंत्र्यांच्या सहीने राज्य सरकारकडून केंद्राला पत्र पाठवण्यात आलं. मी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या भेटीसाठी अनेकवेळा प्रयत्न केले. पत्र देखील पाठवलं. मात्र, आम्हाला एकदाही भेट दिली नाही. परस्पर अशा पद्धतीने प्रकल्प पळवणं हे त्यांना शोभा देणारं नाही, असं विनायक राऊत म्हणाले.

 

News English Summary: Shiv Sena MP Vinayak Raut has criticized state medical education minister Amit Deshmukh for demanding that the Konkan project be shifted to Latur. Also, in Mahavikas Aghadi, the seniors should mediate so that the project does not go awry so that there is coordination, said Vinayak Raut. But dissent in the Thackeray government has once again surfaced from the National Institute of Medicinal Plants.

News English Title: Shivsena has alleged that the project in Sindhudurg was being hijacked by a congress minister Amit Deshmukh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x