22 January 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागणार आहे | अरविंद सावंत यांची टीका

Shivsena, MP Arvind Sawant, MP Narayan Rane, Amit Shah

मुंबई, ०९ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असं देखील भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले होते.

अमित शहांचे विधान यावर्षीचं सर्वात विनोदी आणि हास्यंस्पद आहे, शिवसेनेला आव्हान देणारे स्वत:चं संपले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला आणि अमित शहांना लगावला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही कोणतंही वचन दिलं नव्हतं हे सांगायला अमित शहांना सव्वा वर्ष लागलं…तुम्ही वचन दिलं नव्हतं तर सत्तासंघर्षावेळी महाराष्ट्र सोडून हरियाणात का गेलात? ठाकरे घराणं आणि शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे..बंद खोलीनंतर खाली आल्यावर अमित शहा गेले, तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितले होते, पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत ५०-५० टक्के सत्तावाटप करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं? शिवसेनेची शिडी वापरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उभा राहिली. शिडी नाही म्हणूनच आता भाजपा सत्तेतून बाहेर गेली असं त्यांनी सांगितले.

दरम्यान नारायण राणे यांनी भाजपाला गुंडाचा पक्ष आहे असा आरोप केला होता. त्याचं उत्तर देताना नारायण राणे कसे गुंड आहेत ते फडणवीसांनी सभागृहात सांगितले..त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले. केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतलं तरी काय फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल, धमक्या देऊन माणसांना पक्षात घ्यायचं हेच भाजपाचं काम आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपावर केला आहे.

 

News English Summary: Narayan Rane had accused the BJP of being a party of goons. While replying to this, Fadnavis explained in the hall how Narayan Rane is a goon. Therefore, it was seen that two goons came on the same platform. It doesn’t matter if Rane is included in the Union Cabinet, how did yesterday’s goon become a minister today? Arvind Sawant has accused the BJP of trying to win over people by threatening them.

News English Title: Shivsena MP Arvind Sawant target BJP MP Narayan Rane and Amit Shah news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x