24 December 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच | यात्रेमुळे महाविकास आघाडीला टक्कर वगैरे काही मिळणार नाही - विनायक राऊत

Shivsena

रत्नागिरी, १६ ऑगस्ट | भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असं सांगतानाच नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाच विनायक राऊत यांनी चढवला.

विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला. राज्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आता चार मंत्र्यांना घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

या यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारला टक्कर वगैरे काही मिळणार नाही. यात्रा निघाली नाही निघाली तरी महाविकास आघाडी सरकार कायम रहाणार आहे, असा दावा त्यांनी केला. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा होतोय. त्यावरून सुद्धा खासदार राऊत यांनी राणेंना लक्ष्य केलंय. नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वी वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातल्या सेनेची ताकद कमी होणार नाही, नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला. राणेंना शिवसेनेनेच दोन वेळा पराभव दाखवून दिलाय. राणे म्हणजे पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावंच. त्यामुळे भाजपचीच ताकदच कमी होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Vinayak Raut criticized BJP Jan Ashirwad Yatra news updates.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x