कणकवलीत रोज १५० लोकांसाठी मोफत कमळ थाळीला सुरुवात
कणकवली, १४ एप्रिल: राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.
त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शरज भोजन योजने’ची सुरूवात केली आहे. निराधार दिव्यांग, वृद्ध नागरिक आणि निराधार दुर्धर आजारग्रस्तांसाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे. याअंतर्गत त्यांना दोन वेळचं जेवण पुरवलं जाणार आहे. तसंच गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे करण्यात आलं आहे. यावरून आता नितेश राणे यांनी टीका केली होती.
आता नितेश राणे यांनी कमळ थाळीची घोषणा केली आहे. कणकवली शहरामध्ये नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्या बुधवारपासून दररोज १५० लोकांसाठी ‘कमळ’ थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे या थाळीसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. ही थाली विनामुल्य असणार आहे. कोरोना संकटाच्या काळात गरिबांना ”कमळ” थाळीमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
कणकवली शहरात आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्या पासून रोज १५० लोकांसाठी “कमळ” थाळी सुरु करीत आहोत.
ही थाळी विनामुल्य असणार.
मला विश्वास आहे या संकटाच्या काळात गरिबांना “कमळ” थाळीमुळे नक्कीच मदत होईल!— nitesh rane (@NiteshNRane) April 14, 2020
News English Summary: Now Nitesh Rane has announced the lotus plate. Nitesh Rane has announced that a lotus plate will be provided for 150 people every day from Wednesday with the help of the municipality in Kankavali city. It is important that you do not have to pay a single rupee for this plate. This plate is going to be free. Nitesh Rane believes that the “lotus” plate will provide comfort to the poor during the Corona crisis.
News English Title: Story BJP MLA Nitesh Rane announced free Kamal Thali Kankavli against Shivbhojan Thali Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल