22 December 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

...असं असेल तर यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडूच नये: आ. नितेश राणे

BJP MLA Nitesh Rane, Farmers Loan Waiver

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी शेतकरी कर्जमाफीवर वेगळी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. ‘कोकणातील शेतकरी १०० टक्के कर्ज भरतात, मग कर्ज भरणारे आणि न भरणारे यांना एक सारखाच न्याय…मग यापुढे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचीच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण कोकणातील शेतकरी आपले १०० टक्के कर्ज भरतात. त्यांचं कर्ज थकीत राहत नाही. मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. मग यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीसाठी राज्यातील ३४ लाख ८३ हजार ९०८ खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार, १५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर, ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या.., असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली. मात्र, नितेश राणेंनी या कर्जमाफीचा कोकणवासियांना काहीच फायदा नसल्याचे म्हटले आहे.

 

 

News English Summery: There is no loan waiver for any farmer in Konkan on the loan list. Because the farmers of Konkan pay 100% of their debt. Their debt is not exhausted. Then the same judgment for both the debtor and the non-creditor. Then the farmers of Konkan should no longer pay the debt. Even so, forgiveness is going to happen, tweeted MLA Nitesh Rane.

 

Web Title: Story BJP MLS Nitesh Rane criticize government after loan waiver of Farmers Maharashtra.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x