26 December 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

मुख्यमंत्र्यांच्या समोरच नाराज आ. भास्कर जाधवांनी सेना खासदाराचा हात झटकला

Shivsena MP Vinayak Raut, MLA Bhaskar Jadhav, CM Uddhav Thackeray, Ganpatipule

रत्नागिरी: ‘ज्या शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आले हा एक चमत्कार आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उमरठ, पोलादपूर येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.

व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासदेखील टाळाटाळ केली.

त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत आज देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.

 

Web Title: Story Chief Minister Uddhav Thackeray at Ganpatipule local Shivsena MLA Bhaskar Jadhav anger over MP Vinayak Raut.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x