अध्यक्षाचा नकार तर कार्यकर्त्यांचा पुढाकार; डबलढोलकी भूमिकेमुळे कोकणी माणूस सावध? सविस्तर
सिंधुदूर्ग: मागील काही दिवसांपासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आधी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आता भूमिका बदलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला. याआधीही नाणारला विरोध होता आणि यापुढेही असेन अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यींनी मांडली.
शिवसेनेचे धोरण व निर्णय मी ठरवतो, जाहिरातदार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेनेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत होती. विरोधकांनी शिवसेनेच्या सतत बदलणाऱ्या धोरणावर टीका केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका बदलली असा आरोप केला जाऊ लागला होता. या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पडदा टाकला.
मात्र पुढे नाणार प्रकल्पला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांशी माझी भेट झालेली नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. ‘नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे’, असं शिवसैनिकांनी सांगितलं. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता, असंदेखील ते पुढे म्हणाले.
त्यामुळे एकाबाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोध करत असताना दुसऱ्या बाजूला शिवसैनिक समर्थन करत असल्याचं चित्र उभं करून हा प्रकल्प किती फायद्याचा आहे ते समजून सांगताना दिसत आहेत. मात्र असंच चित्र उभं करण्याचं त्यांना सांगण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. कारण त्यामुळे भविष्यात त्याचे फायदे पुढे करून इतर दुष्परिणाम झाकण्यास मदत होईल. वास्तविक केंद्रीय पातळीवर हा प्रकल्प कोकणातच होणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कित्येक लाख कोटींचा प्रकल्प उभारण्याची शिवसेना हितसंबंध जपणार असं होऊच शकत नाही असा आरोप स्थानिक विरोधक करत आहेत.
शिवाय ज्या कंपनीला हा प्रकल्प उभारायचा आहे त्या कंपनीत उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मित्र मुकेश अंबानी गुंतवणूकदार म्हणजे शेअरहोल्डर आहेत. त्यामुळे नक्की काय योजना आहे त्याचा विरोधकांना अंदाज आला आहे. रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये केली होती. रिलासन्स उद्योग २०१८-१९ आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारी समूह असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं. सौदी अराम्को रिलायन्समधील २० टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली होती. रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यातील ही एक घोषणा होती.
रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक झाल्याचं मुकेश अंबानी म्हणाले होते. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल आणि केमिकल (ओ टू सी) व्यवसायात गुंतवणूक करणार आहे. अराम्कोकडून रिलायन्समध्ये ५.२५ लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. ‘रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. सौदी अराम्को आणि रिलायन्समध्ये बऱ्याच कालावधीपासून यासाठी चर्चा सुरू होती,’ असं अंबानी म्हणाले होते.
रत्नागिरीतील नाणार प्रकल्प गुजरातला जाणार म्हणत हवा केली, मात्र निसर्गाला हानिकारक असे विनाशकारी प्रकल्प गुजरात सरकार स्वीकारणार नाही हे आधीच ठाऊक होते आणि संबधित सौदी कंपनीला प्रकल्प उभारणीचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकणातील जागाच हवी होती. मध्यंतरी या निमीत्ताने मोदींच्या सौदीमधील नेत्यांशी भेटीगाठी झाल्या होत्या, तर सौदी सरकारने मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार देखील दिला होता. दरम्यान हा प्रकल्प सौदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भारत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वकाही करत आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्तेत बसलेले मंत्री हे दिल्लीतील गुजराती भाजप नेत्यांची बुजगावणी असल्याने तो प्रकल्प येथेच लादला जाणार हे तितकंच सत्य आहे.
स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात हलवण्यात आला असं सांगण्यात आलं. त्यामुळे आता रायगडमधून या प्रकल्पाला विरोध होऊ नये यासाठी भाजपनेत्यांनी सत्ता येणार याच आशेने त्यावेळीच सावध पाऊलं उचलली होती. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. स्थानिकांच्या विरोधामुळे मागील काही वर्षात नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प चांगलाच वादात अडकला होता. परंतु आता हा प्रकल्प नाणार येथून हलवला असून रायगड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. त्यामुळे आता तरी प्रकल्पात काही अडचणी येऊ नयेत म्हणून पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. या भेटी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे या विषयवार कोणताही प्रदूषण अथवा सामाजिक जवाबदारी असे जिव्हाळ्याचे विषय आडवे आणत नसावेत असं म्हटलं जातं.
नाणार आंदोलनाचा विरोध मावळला म्हणून प्रथम त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला असावा असं विरोधक म्हणतात. त्यानंतर सर्वकाही पूर्वीप्रमाणे भासवून सामनाच्या माध्यमातून स्वतःच कोकण दौऱ्यापूर्वी पिल्लू सोडून परिस्थितीचा अंदाज घेण्यापूर्वीच नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांची फौज सज्ज ठेवण्यात आली आणि त्यांच्या संबंधित बातम्या प्रसार माध्यमांच्या मार्फत कोकणात पोहोचण्यास सुरुवात झाली. आज तिकडच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यास स्थानिक शिवसैनिकच जमिनीच्या सौद्यांमध्ये मालकांशी संवाद साधत असल्याचं स्थानिक सांगतात आणि त्यावरून बरंच काही समोर येतं. त्यामुळे वरवर वाटणारे योगायोग नसून अगदी नियोजितपणे सर्वकाही असल्याचं विरोधक सांगत आहेत.
Web Title: Story CM Uddhav Thackeray opposed Nanar Refinery Project but Shivsena workers supported project.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो