कंटेनर थिएटर; तर आ. नितेश राणेंची संकल्पना ठरू शकते मराठी चित्रपट श्रुष्टीसाठी संजीवनी
देवगड: मागील अनेक वर्षे हिंदी चित्रपट वेळीच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ येते, त्यावेळी मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतो हे सांगणारे लोक, निर्माते, काही राजकीय पक्ष पुढे येत सिनेमागृह तोडण्याची भाषा करतात. पण दुस-यांची सिनेमागृह फोडण्यापेक्षा स्वत:चे सिनेमागृह उभे करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्याची किमया आ.नितेश राणे करताना दिसत आहेत.
साधारण शंभरएक प्रेक्षक बसतील इतकी आसनक्षमता, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सर्वोत्तम दर्जाचे साऊंड प्रूफ तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, असे सर्व सुविधायुक्त, परिपूर्ण ‘कंटेनर थिएटर’ कोकणातील स्थानिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे थिएटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे बसवता येऊ शकते. लवकरच ते महाराष्ट्राच्या तमाम ग्रामीण जनतेच्या मनावर गारुड करेल यात शंका नाही, असे जाणकार म्हणतात.
भारतातील पहिले कंटेनर थिएटर आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड मध्ये साकार झाले आहे. एकीकडे स्थानिक नागरिकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे तर दुसरीकडे मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात सुरु केलं आहे.
२०१९ साली देवगडमध्ये झालेल्या ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘कंटेनर थिएटर’ ही संकल्पना उदयास आली होती. तरुणांनी केलेला हा प्रयोग म्हणजे, ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणून अनेकांनी या संपल्पनेकडे दुर्लक्ष केले. मात्र, सद्यस्थितीत ही संकल्पना राज्यभरात राबवता येईल, असा विश्वास या थिएटरला मिळालेल्या दणदणीत प्रतिसादातून निर्माण झाला आहे. ‘गाव तेथे चित्रपटगृह’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून केवळ कागदोपत्री राहिलेली असताना, ‘कंटेनर थिएटर’मुळे मात्र ती लवकरच साकार होईल असे दिसते.
‘गाव तेथे चित्रपटगृह’ हे आजवर सत्तेत आलेल्या अनेक सरकार आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेले आणि पूर्णत्वास न गेलेले पारंपरिक आश्वासन! आजही अनेक ठिकाणी गावांमध्ये तंबू लावून सिनेमे दाखवले जातात. मात्र बी ग्रेड किंवा मोठ्या पडद्यांवर प्रदर्शित न होऊ शकलेल्या चित्रपटांशिवाय या गावकरांच्या नशिबी दुसरे काही अद्याप तरी आलेले नाही. तसे सिनेमे पाहू नये असेही काही नाही. मात्र सर्वोत्तम सिनेमे ग्रामीण भागातील लोकांना दाखवण्यासाठी भव्य चित्रपटगृह उभारण्याचा आजवरच्या प्रत्येक सरकारचा मानस होता. परंतु काही कारणास्तव आजपर्यत हा मानस पूर्णत्वास येऊ शकला नाही. त्यावर तोडगा म्हणून कंटेनर थिएटर ही अत्यंत मार्मिक कल्पना ठरू शकते. मोठ्या मल्टिप्लेक्सच्या बांधणीत मुळापासूनच भव्यता असते पण त्यातून ग्रामीण ग्राहक निर्मात्यांना आणि कलाकारांना गमवावा लागत आहे. मात्र अशा संकल्पना राज्यातील ग्रामीण भागात वाढविल्यास एकूणच मराठी चित्रपट श्रुष्टीला देखील चांगलं उत्पन्न मिळेल यात अजिबात शंका नाही.
News English Summery: The concept of ‘container theater’ emerged at the Sindhudurg Film Festival in Devgad in 2019. This experiment by the youth is what many neglected to call the ‘nine days of the new’. However, at present, the concept has been created in response to the theatrical belief that this concept can be implemented across the state. While the concept of ‘village there movie theater’ has only been in the papers for many years, the container theater seems to be coming soon! With a seating capacity of around one hundred spectators, complete air conditioning, best quality sound proof technology and food stalls, all convenient, perfect ‘container theaters’ are coming to the locals’ liking. There is no doubt that it will soon be wreaking havoc on the minds of all the rural population of Maharashtra.
News English Title: Story Container theater concept of MLA Nitesh Rane need to adopt in whole rural part of Maharashtra for Marathi movies.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON