मुख्यमंत्र्यांसमोर हात झटकला, पण अजित पवारांचे थेट ड्रायव्हर झाले आ. भास्कर जाधव

रत्नागिरी, १४ मार्च : शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी स्वतः व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले होते. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांचा हात झटकला होता. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासदेखील टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं.
शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधवांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची रत्नागिरीत भेट घेतली. अजितदादा आणि जयंत पाटील रत्नागिरीत आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. या वेळी अजितदादा आणि जयंत पाटलांनी भास्कर जाधवांची भेट घेतली. या भेटीनं भास्कर जाधवांचा चेहरा खुलला होता.
चिपळूणमधील हेलिपॅडपासून भास्कर जाधव यांच्या घरापर्यंत स्वतः जाधव यांनी गाडी चालवली. यावेळी गाडीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हेदेखील होते. जाधव यांच्या या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी चिपळूण येथे आले होते.
News English Summery: Shiv Sena’s angry MLA Bhaskar Jadhav did the same to the Deputy Chief Minister Ajit Pawar’s car in Chiplun. From the helipad of Chiplun to the house of Bhaskar Jadhav, Jadhav himself drives. NCP’s state president and minister Jayant Patil was also in the car at this time. Due to this essence of Jadhav, the churches have been banished in political circles. After establishing power in the state, Shiv Sena did not allow Guhagar MLA Bhaskar Jadhav to be included in the Cabinet, using force. After being inducted into the Cabinet, Bhaskar Jadhav had expressed his displeasure at Chief Minister Uddhav Thackeray’s words. However, this was rejected by Shiv Sena.
Web News Title: Story Deputy Chief Minister Ajit Pawar meet Shivsena MLA Bhaskar Jadhav News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल