मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी अन राम मंदिराला फक्त १ कोटी? - निलेश राणे
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो आहे. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेतच राहणार असं म्हणाले होते.
दरम्यान, यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, “लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त १ करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी दिले असल्याचा खोचक टोला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी??? pic.twitter.com/XNCJEvWK6V
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 7, 2020
News English Summery: Maharashtra Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray was on a visit to Ayodhya yesterday. At this time, Uddhav Thackeray announced a grant of Rs 1 crore for the construction of Ram temple. At that time, Uddhav Thackeray also answered reporters’ questions. He opposed the criticism that Shiv Sena withdrew from Hindutva in coalition with the Congress. I am separated from BJP, not Hindutva. Uddhav Thackeray had said that BJP is not Hindutva. Uddhav Thackeray met Ramla at 4 pm. He then left for Mumbai. Meanwhile, Congress leader and former MP Nilesh Rane has taken notice of Chief Minister Uddhav Thackeray. Nilesh Rane tweeted, “No shame in Chief Minister Uddhav Thackeray announcing only Rs 1 crore for Ram temple. 45 crore for his son’s penguin vision but only 1 crore for Ram temple.”
Web News Title: Story Former MP Nilesh Rane attacked CM Uddhav Thackeray over Donation given for Ram Mandir Nirman.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC