22 December 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आणीबाणीत अटक टाळण्यासाठी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींशी मांडवली केली होती

Balasaheb Thackeray,  BJP Leader Nilesh Rane, Indira Gandhi

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली होती. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं होतं. २००२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिरंगा ध्वज’ राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला होता.

शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिप्रश्न केला आहे. यावर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही.

काय आहे नेमकं ट्विट?

 

 

News English Summery: BJP leader Nilesh Rane has criticized Bal Thackeray for making an arrest in the emergency. He has targeted Shiv Sena on Twitter. ‘BJP has a false crust of Veer Savarkar. Veer Savarkar was a major contributor to the freedom struggle, where was the BJP or the ‘RSS’ family in the independence movement? Rane has targeted it on Twitter. “Balasaheb was in freedom struggle? Who was Thackeray before? Indira Gandhi arranged for emergency in order to avoid arrest. Balasaheb has not forgotten that history, “tweeted Nilesh Rane.

 

Web News Title: Story Indian politician Shivsena Balasaheb Thackeray compromised emergency with Former PM Indira Gandhi BJP Leader Nilesh Rane.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x