23 January 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

कोकण: नाणार'वरून शिवसेनेच्या २२ शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Nanar Refinery, Konkan, Shivsena, CM Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग: कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिली आहेत. सागवे आणि इतर गावातील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या २२ शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आधी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आता भूमिका बदलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला. याआधीही नाणारला विरोध होता आणि यापुढेही असेन अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यींनी मांडली होती.

शिवसेनेचे धोरण व निर्णय मी ठरवतो, जाहिरातदार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेनेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत होती. विरोधकांनी शिवसेनेच्या सतत बदलणाऱ्या धोरणावर टीका केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका बदलली असा आरोप केला जाऊ लागला होता. या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पडदा टाकला होता.

मात्र पुढे नाणार प्रकल्पला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांशी माझी भेट झालेली नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. होतं एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. ‘नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे’, असं शिवसैनिकांनी सांगितलं होते. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता, असंदेखील ते पुढे म्हणाले होते.

मात्र त्यामुळे शिवसेनेवर दुप्पटी भूमिकेमुळे रोषाला सामोरं जाण्याची वेळ येण्याची लक्षणं दिसताच संबंधित शिवसैनिकांची पक्षांतर्गत केली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण तापणार असल्याचं लक्षण दिसू लागलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाणार रिफायनरी प्रकल्पाला संघटनेच्या नियमानुसार दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांची पक्षाने तडकाफडकी विभागप्रमुखपदावरुन जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ विभागातील शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत.

 

Web Title: Story Konkan Naanar Refinery issue resigned of Shivsena 22 branch head after warning received from Party.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x