22 November 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची मोठी गर्दी; कोण जाणार झोडायला पुढे? पेच वाढला

Rajapur, Nanar Refinery Project, Shivsena

रत्नागिरी: नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. काल शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिला होता. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला होता.

नाणार रिफायनरीच्या विरोधात कात्रादेवी मैदानात झालेल्या शिवसेनेच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी हे भाष्य केलं होतं. नाणार रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची जाहीर घोषणाही यावेळी करण्यात आली होती. तसंच नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणात नकोच, असा ठाम निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, आज दुपारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ बोलविण्यात आलेल्या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित राहिले होते. यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेची भगवी टोपी, गमछा घातला होता. यामुळे खासदारांचे आदेशच शिवसैनिक मानत नसल्याचे चित्र आज राजापूरमध्ये दिसले. मेळाव्यासोबत सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे.

 

News English Summery: He made this remarks at the Shiv Sena Elgar rally at Katra Devi ground against the Nanar refinery. It was also announced that Manda Shivalkar, a member of the Shiv Sena’s Zilla Parishad, who supported the Nanar refinery, was expelled from the party. It was also stated in the meeting that it was determined not to go to Konkan in a destructive project like Nanar. However, thousands of people attended the rally in support of the Nanar refinery this afternoon. Many of them were wearing a saffron hat and a saffron hat. Due to this, the pictures of MPs who did not obey the orders of Shiv Sena were seen in Rajapur today. Satyanarayan worship has also been organized along with the fair. Despite the strong opposition taken by the Shiv Sena, the rally organized at Dong Titha (Ta Rajapur) for refinery support has been huge. Numerous local farmers, villagers and various office bearers have attended the rally.

 

Web News Title: Story open support Nanar Refinery project after Shivsena MP warning party workers at Rajapur.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x