नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं थोबाड फोडा; तर राणेंबद्दल काय म्हणाले राऊत?
रत्नागिरी : नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिलं आहे. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तसेच नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला आहे.
आज दिनांक ०१ मार्च २०२० रोजी, सकाळी १०:०० वाजता,
नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी शिवसेना व कोकण रिफायनरी प्रकल्प संघर्ष संघटना यांचा संयुक्त मेळावा सागवे कात्रादेवी येथे संपन्न झाला. pic.twitter.com/s9UDaXYn2j— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) March 1, 2020
दुसरीकडे नाणार समर्थनार्थ शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी बजावलं. तर नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या दलालांची गृह खात्याच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बजावलं.
नाणार रिफायनरीच्या विरोधात कात्रादेवी मैदानात झालेल्या शिवसेनेच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. नाणार रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसंच नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणात नकोच, असा ठाम निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.
विनायक राऊत म्हणाले की, भाजपाचं दिल्लीत पानीपत झालं आहे. तसेच भाजपाचे खासदार नारायण राणे यांना पक्षात समावेश करुन भाजपाने पनवती लाऊन घेतली असल्याचे सांगत विनायक राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या प्रश्नावर राज ठाकरेंना भाजपाला सोबत घ्यायचं असे तर घ्यावे, कारण मागचा इतिहास पाहिला तर भाजपाची वाटचाल ही झिरो पर्सेंटकडे चाललेली आहे, असं सांगत विनायक राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
News English Summery: Despite the cancellation of the Nanar refinery’s notification, the Shiv Sena had published refinery’s advertisement in the Saamana Newspaper. Shiv Sena held a meeting in the Nanar area to break the barrier. The Shiv Sena and the Konkan Refinery Project organized a joint meeting. Representatives of anti-refinery organizations were also present at the meeting. Although the Nanar refinery was canceled and the assembly elections were over, some Shiv Sena office-bearers have openly supported the refinery against the party because of the advertisement of the refinery in the match. So it was time for the Shiv Sena to re-convene and explain its role against the refinery. Naturally, the Shiv Sena leaders who have been stranded have to warn their cadres of the party, announcing the expulsion of Zilla Parishad members.
Web News Title: Story Shivsena MP Vinyak Raut comment on Konkan Nanar Refinery supporters.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO