7 January 2025 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER
x

तळिये भूस्खलन | मुख्यमंत्री दरडग्रस्त तळिये गावात दाखल | तळिये दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री

Konkan rain

रायगड, २४ जुलै | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या महाडजवळील तळिये गावाची पाहणी करत आहे. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, या सर्वांनी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली आहे.

तळियेत आतापर्यंत 40 पेक्षा जास्त मृत्यू:
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.

ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त लेाकांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबंधित गावाची पाहणी करणार आहेत. ते गावातील लोकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने तळिये गावात रवाना झाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Talai landslide CM Uddhav Thackeray visit villages of Raigad and Mahad news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here To Download

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x