18 November 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

स्वप्नालीची शिक्षणाची तळमळ | आ. नितेश राणे तिच्या हॉस्टेलच्या मदतीसाठी पुढाकार घेणार

dreamy struggle, Swapnali Sutar, Sindhudruga, MLA Nitesh Rane

कणकवली, १९ ऑगस्ट : मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. ध्येय गाठण्याची तिची जिद्द नक्कीच विचार करण्यासारखी आहे.

स्वप्नाली सुतार ही कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील तरुणी. लॉकडाऊनमध्ये ती गावी अड़कली त्यातच तिचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. मात्र गावात साधा फोन लागताना कठीण तिथे इंटरनेट कसं असणार. मात्र ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली भावाचा मोबाईल घेऊन राना-वनात इंटरनेटसाठी फिरु लागली. घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला पुरेसे इंटरनेट मिळू लागले.

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे. कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात इंटरनेटचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत होती, कॉलेजचे ऑनलाईन लेक्चरही बुडत होते. त्यामुळे स्वप्नालीने गावातील एका डोंगरावर जाऊन अभ्यास करण्याचं निश्चित केले. भरपावसात फक्त एका झोपडीच्या आडोशाला ती कॉलेजचं ऑनलाईन क्लासला हजेरी लावते.

सुरुवातीच्या दिवसात १५-२० दिवस मी पावसात छत्री पकडून उभी राहून लेक्चर अटेंड केले. त्यानंतर घरातल्यांनीही पाठिंबा दिला. माझ्या भावांनी डोंगरावर एक छोटीशी झोपडी तयार केली. त्याच झोपडीत मी अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास करते, ९ ते १२.३० वाजेपर्यंत लेक्चर अटेंड करते. त्यानंतर १.३० ते ६ मध्ये प्रॅक्टिकल होते. साडेसहा वाजता सर्व आटपून घरी परतते. स्वप्नालीचा हा दिनक्रम रोजचा झालेला आहे. स्वप्नालीला मदतीची गरज नाही. पण तिला मुंबई हॉस्टेलसाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. ती दिव्याला राहते आणि तिचं कॉलेज गोरेगाव येथे आहे. प्रवासामध्ये तिचे येऊन-जाऊन ५ तास जातात. हॉस्टेलची फी ५० हजार आहे. पण ती आवाक्याबाहेर असल्याने दिव्याला राहायला लागतं. यासंदर्भात स्थानिक आमदार नितेश राणेंनी तिच्या हॉस्टेलची अडचण सोडवू असं आश्वासन दिलं आहे.

 

News English Summary: Swapnali Sutar is a young girl from Dariste village in Kankavli taluka. Her online education started when she got stuck in the village in lockdown. But how can there be internet when it is difficult to have a simple phone in the village. However, the dream-obsessed Swapnali took her brother’s mobile and started wandering in the forest for internet.

News English Title: The dreamy struggle for online learning Swapnali Sutar from Sindhudrug Story MLA Nitesh Rane decided to help News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x