14 November 2024 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते दरेकरांना नारायण राणे एकेरी शब्दात म्हणाले, थांब रे, मध्ये बोलू नको

Narayan Rane

मुंबई, २८ जुलै | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यापासून आक्रमक स्वभावाचे अनुभवी नेते आहेत. त्यात प्रशासन हाताळण्याचा त्यांना मोठा अनुभव असल्याने त्यांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सर्वांनी पाहिलं आहे. मात्र भाजपमध्ये आता केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने कालपर्यंत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आदरपूर्वक उच्चार करणारे नारायण राणे यांना त्याच दरेकरांचा एकेरी भाषेत आणि एका ओळीत शांत केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. एखाद्या स्थानिक कार्यकर्त्यांना ज्या शब्दात सुनावलं जातं ते विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते दरेकर यांच्या बाबतीत घडलं आहे.

झालं असं की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला होता. यावेळी नारायण राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. परंतु त्याच संवादादरम्यान, मधेच बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांना देखील राणेंनी एकेरी उल्लेख करत गप्प केलं. ‘थांब रे मध्ये बोलू नको’ असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसलं आहे.

नेमका काय होता संवाद;
* नारायण राणे (अधिकाऱ्यांना उद्देशून) – तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता?
* नारायण राणे (प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको
* (प्रवीण दरेकरांनी हलकीशी मान डोलावली)
* (पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून) मॉबमध्ये सोडून येऊ?
* काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत
* मग, त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय. दात काढताय?
* (अधिकाऱ्याचं उत्तर – हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे)
* इथं काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही
* चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Minister Narayan Rane said shut up to Pravin Darekar during Chiplun visit in front of camera news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x