8 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

दिल्लीतून फोन करून कोणाच्या कानाखाली मारायची नाही असं सांगितलंय, पण बाकी अवयव आहेत ना - नारायण राणे

Narayan Rane

सावंतवाडी, २९ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.

दिल्लीतून फोन करून कोणाच्या कानाखाली मारायची नाही असं सांगितलंय, पण बाकी अवयव आहेत ना – Union minister Narayan Rane target Sanjay Raut in Sawantwadi speech :

कणकवलीतुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा सुरू झाला. देवगड, मालवण, सावंतवाडीत राणेंनी या दौऱ्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आदी नेते दौऱ्यात सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. राणे म्हणाले, की संजय राऊत हे राज्यसभेत भेटल्यानंतर वेलडन म्हणतात. बाहेर जाऊन टीका का करतो असे विचारले असता हे राजकारण असल्याचे सांगतात. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत की पवारांसोबत हा प्रश्न आहे. राणेजी मी तुमच्या सोबत असे त्यांनी म्हटल्यावर मग पवार साहेबांचे काय असे विचारले. रोज त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. ते काय बोलण्याच्या लायकीचेदेखील नाहीत, असे राणे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Narayan Rane target Sanjay Raut in Sawantwadi speech news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x