22 December 2024 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

तो वरुण सरदेसाई येऊ देच, आता आला तर परत नाही जाणार | नारायण राणेंचं धमकी सत्र सुरूच

Varun Sardesai

रत्नागिरी, २७ ऑगस्ट | युवासेना सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.

तो वरुण सरदेसाई येऊ देच, आता आला तर परत नाही जाणार, नारायण राणेंचं धमकी सत्र सुरूच – Union minister Narayan Rane threat Yuva Sena leader Varun Sardesai :

दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं.

त्याबाबत नारायण राणे म्हणाले, “आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढी त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच”, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. आपल्या पक्षाला खासदार आणि विधानसभेत राज्य येण्यासाठी आमदार पाठवणं गरजेच आहे, शिवसेना औषधालाही उरली नाही पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Narayan Rane threat Yuva Sena leader Varun Sardesai.

हॅशटॅग्स

#VarunSardesai(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x