23 February 2025 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

माझं देखील वृत्तपत्र आहे | लवकरच चॅनल देखील येईल | नारायण राणेंचा सेनेला थेट इशारा

Narayan Rane

सिंधुदुर्ग, २९ ऑगस्ट | नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.

माझं देखील वृत्तपत्र आहे, लवकरच चॅनल देखील येईल, मग सकाळ-संध्याकाळ दाखवतो – Union Minister Narayan Rane warn Shivsena over criticizing through Saamana Editorial :

नारायण राणेंनी म्हटलं की, “माझा वैयक्तिक राग अजिबात नाही आणि मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की, माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. याची मी खबरदारी घेईन, तुम्ही काळजी करू नका. हा माझा त्यांनी शब्द घेतला.” असं त्यांनी सांगितलं आहे.

राणे पुढे म्हणाले की , “पण आता हे उठसूठ नारायण राणे… नारायण राणे बोलल्यावर? माझं देखील वृत्तपत्र आहे आणि लवकरच चॅनल देखील येईल. मग आम्ही सकाळ संध्याकाळ दाखवतो, लोकं काय म्हणणार की यांना चांगलं काही दाखवता येत नाही. राज्यातील, देशातील काही प्रश्न नाही दाखवता येत, सांगता येत. नुसतं एकाच्याच विरोधात लागणं. अरे पण मी तुमचं काय घेऊन आलेलो नाही. मी माझ्या कर्तृत्वाने जे काय घडलो आहे, त्यात तुम्हाला काय राग?. तुम्हाला उलट वाटलं पाहिजे की या माणसाने शिवसेनेसाठी फार केलेलं आहे. असं का वाटत नाही.” असंही यापुढे बोलताना नारायण राणेंनी बोलून दाखवलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  Union Minister Narayan Rane warn Shivsena over criticizing through Saamana Editorial.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x