15 January 2025 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कोकण: उत्तर भारतीयांच्या कोकणात सत्यनारायणाच्या पूजा आणि उद्या छटपूजा?

Uttar Bharatiya, Konkan

रत्नागिरी: उत्तर भारतीय समाज सर्वत्र पसरतो आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांपुरता मर्यादित असणारा समाज सध्या कोकणात देखील मोठया प्रमाणावर स्थिरावतो आहे. विशेष म्हणजे हा समाज एकत्र येऊन आज स्वतःच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. आज तरी या फलकांवर कोणत्याही पक्षाचं नाव असलं तरी त्यांच्यातीलच काही लोकं प्रतिनिधी म्हणून उभे केले जातील आणि नंतर ते थेट स्वतःला एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासोबत जोडून राजकीय फायदा उचलण्यास सज्ज होतील अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये रंगली आहे.

भविष्यात येथील भूमिपुत्रांच्या रोजगाराला देखील मोठा धक्का बसून येथील बाजापेठांमध्ये देखील याच समाजाचं वर्चस्व निर्माण होईल अशी शंका स्थानिकांना आहे. मात्र याकडे सध्या तरी समाज माध्यमांनी लक्ष केंद्रित केलं आहे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत राजकीय पक्ष याकडे लक्ष देतील अशी परिस्थिती नाही. सध्या या भागात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्राबल्य असल्याने हे समाज राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या दावणीला बांधले जातील अशी स्थानिकांना शंका आहे.

मात्र यावरून कोकणातील जमिनी, भूमिपुत्रांच्या रोजगार आणि स्थानिकांच्या छोट्या मोठ्या उद्योगांना देखील धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे यापुढे स्थानिक मराठी समाज काय भूमिका आणि काळजी घेणार यावरच सर्व अवलंबून असल्याचं म्हटलं जातं आहे. दरम्यान, समाज माध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

Web Title:  Uttar Bharatiya community expanding in Konkan region.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x