23 January 2025 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Chanakya Niti | समोरच्या व्यक्तीचे वास्तव जाणून घेण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा

Chanakya Niti

मुंबई, १५ नोव्हेंबर | आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण त्याच कठोरपणात जीवनाचे सत्य दडले आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत हे शब्द आपल्याला मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी आणखी एका विचाराचे विश्लेषण करू. आजच्या चिंतनात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, इतरांचे वास्तव जाणून घेण्यासाठी (Chanakya Niti) तुम्ही काय केले पाहिजे.

Chanakya Niti. Show people that you are stupid and you don’t know anything, by this you will know their true face said Acharya Chanakya :

लोकांना दाखवा की तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला काहीही माहित नाही, याद्वारे तुम्हाला त्यांची स्थिती कळेल – आचार्य चाणक्य

या विधानात आचार्य चाणक्य यांनी इतरांचे वास्तव जाणून घेण्याचा मार्ग सांगितला आहे. आचार्य म्हणतात समोरचा खरा चेहरा जाणून घ्यायचा असेल तर हा एक मार्ग आहे. त्याच्यासमोर मूर्ख बनण्याचा हा प्रकार आहे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा समजू शकतो.

वास्तविक जीवनात तुम्ही अनेक प्रकारच्या लोकांसमोर येतात. काही लोक तुमच्यासमोर खूप छान वागतात पण तुमच्या मागे वाईट वागतात. असा दुहेरी स्वभाव ते आपल्या समोर ठेवतात ते आणि आपल्याला कळतही नाही, असे त्यांना वाटते. पण ते हे विसरतात की त्यांना त्यांच्या या स्वभावाचा जसा उपयोग करता येतो तसा समोरची व्यक्तीही ते करू शकते. अशा लोकांचा मुखवटा काढून टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यासमोर असे वागणे, की आपल्याला याबद्दल काहीही माहिती नाही.

तुमच्या तशा वागण्याचे समोरच्याला अजून प्रोत्साहन मिळेल. यानंतर ते अशी चूक करतील की त्यांची सर्व गुपित आपोआप तुमच्यासमोर स्पष्ट होईल. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणाले आहेत की लोकांना दाखवा की तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला काहीही माहित नाही, याद्वारे तुम्हाला त्यांची स्थिती कळू शकेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chanakya Niti show people that you are stupid and you do n0t know anything.

हॅशटॅग्स

#ChanakyaNiti(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x