15 January 2025 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Relationship Tips | रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या मुलींनी चुकून सुद्धा या गोष्टी करू नयेत; अन्यथा उध्वस्त होईल नातं

Relationship Tips

Relationship Tips | तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर, मुलींनी या चार गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा काही छोट्या मोठ्या गोष्टींमुळे दोघांमध्ये वाद विवाद होतात. अशावेळी दोघंही तोंड बंद ठेवून गप्प बसतात आणि एकमेकांशी बोलणं टाळतात. किती दिवस चालू राहणार? या गोष्टींमुळे भरपूर अंतर वाढू लागते ज्याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यभर होऊ लागतो. आज या लेखातून मुलींनी नात वाचवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजे याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

कम्युनिकेशन गॅप :
मुलींनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, तुमच्या पार्टनर बरोबर तुमचं कम्युनिकेशन गॅप वाढणार नाही. उलट तुमच्या मनातील भावना तुमच्या पार्टनर बरोबर शेअर करून त्याच्याही मनातल्या भावना जाणून घ्या. असं केल्याने दोघं मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलू लागालं.

अविश्वास :
तुमचा तुमच्या पार्टनरवर शंभर टक्के विश्वास असलाच पाहिजे. आजकाल अविश्वासामुळे अनेकांचं नातं उध्वस्त झालं आहे. पार्टनरसमोर अविश्वास दाखवल्यामुळे समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट उरत नाही सोबतच त्याचं मन तुमच्यामुळे दुखवलं जाऊ शकतात. म्हणूनच आपल्या पार्टनर वर विश्वास ठेवून पहा आणि चांगलं कम्युनिकेशन देखील ठेवा.

जास्तीच्या अपेक्षा ठेवणे :
तुम्ही तुमच्या पार्टनरच्या परिस्थितीनुसारच त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजे. तुमच्या जास्तीच्या अपेक्षांमुळे पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळी भावना निर्माण होऊ शकते जी तुमचं नातं खराब करू शकते.

पर्सनल स्पेस न देणे :
बऱ्याचदा तुम्ही तुमच्या पार्टनरला पर्सनल स्पेस न देऊन दोघांमधलं नातं खराब करता. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. पार्टनरचा वारंवार फोन चेक करणे, त्याच्यावर अविश्वास दाखवणे, संशय घेणे टाळले पाहिजे. तुमच्या अशा वृत्तीमुळे तुमच्या पार्टनरचं मन तुमच्यावरून उडून जाईल.

समस्यांकडे दुर्लक्ष :
प्रत्येक पुरुष आपल्या आवडीच्या स्त्री जवळच मनमोकळेपणाने बोलतो. त्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्याबरोबर सर्व काही शेअर करत असेल सोबतच एखादा प्रॉब्लेम देखील सांगत असेल तर दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. नाहीतर तुमचा पार्टनर तिथून पुढे तुम्हाला कोणतीच गोष्ट सांगणार नाही. सोबतच तुम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं मन देखील नाराज होईल. आम्ही सांगितलेले या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचं वैयक्तिक जीवन सुधरवा.

News Title : Relationship Tips for husband and wife 04 September 2024.

हॅशटॅग्स

#Relationship Tips(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x