23 February 2025 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Relationship Tips | विवाहित पुरुषांनी या 4 गोष्टी टाळाव्या; अन्यथा पत्नीची चिडचिड वाढून नात्यात अंतर वाढू लागेल

Relationship Tips

Relationship Tips | लग्नही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना अतिशय समजूतदारपणे समजून घेतलं पाहिजे. परंतु बऱ्याचदा आपल्याकडून आपल्या पत्नीला नाहक त्रास तर होत नाही ना? त्याची शहानिशा करायला पती विसरतात. त्यांना असं वाटतं की आपली पत्नी सगळीकडे सांभाळून घेते.

परंतु आपल्या पत्नीची नेमकी चिडचिड कोणत्या गोष्टीमुळे होते याकडे पती दुर्लक्ष करतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यभर होतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे तुमची पत्नी तुमच्यावर चिडचिड करते.

1) घरातल्या कामांकडे दुर्लक्ष करणे :
सहसा सर्वच महिला घरामधील काम चोखपणे करतात. लादी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, सकाळपासून ते रात्री झोपण्यापर्यंत महिला घर आवरण्यात व्यस्त राहतात. अशावेळी पतीने देखील आपल्या पत्नीची मदत केली पाहिजे. तीच्या खांद्यावरच्या कामावरचा भार कमी करून पत्नीला समजुन घेतलं पाहिजे.

2) सर्वांसमोर पत्नीला वाईट बोलणे :
काही पती आपल्या पत्नीच्या स्वयंपाकावर आणि राहणीमानावरून तिला वेड वाकड बोलण करत असतात. त्याचबरोबर संपूर्ण घरासमोर तिला बेइज्जत करतात. अशावेळी पत्नीच्या आत्म सन्मानाला ठेच लागू शकते. सोबतच तुम्हा दोघांमधला कम्युनिकेशन गॅप वाढू शकतो.

3) इमोशनल सपोर्ट :
प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीला इमोशनली सपोर्ट केला पाहिजे. काही वेळा पत्नी एखाद्या कारणामुळे किंवा एखाद्याच्या बोलण्यामुळे नाराज झालेली असू शकते. अशावेळी तिला इमोशनल सपोर्टची अत्यंत गरज असते. परंतु काही पती आपल्या पत्नीच्या इमोशनल बघण्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे पत्नीची चिडचिड होते.

4) छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष :
पतीने पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोघांमध्ये फूट पडू शकते. महिलांना आपल्या बारीक सारीक गोष्टींचं नवऱ्याने सांत्वन केलं पाहिजे असं कायमच वाटत असतं. परंतु पुरुष आपल्या बेजवाबदार वागण्यामुळे पत्नीच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नात्यामध्ये तेढ निर्माण करतात.

News Title : Relationship Tips for married couples check details 02 September 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Relationship Tips(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x