21 November 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना

Highlights:

  • Shardiya Navratri 2024
  • चंद्रघंटा माता कोण आहे :
  • मणिपूर चक्र म्हणजे काय :
  • अशा पद्धतीने करा मणिपूर चक्र मजबूत :
Shardiya Navratri 2024

Shardiya Navratri 2024 | शारदे नवरात्रीला सुरुवात झाली असून आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला समर्पित केला जातो. नवदुर्गेच तिसर रूप म्हणजेच देवी चंद्रघंटा होय. तुम्हाला तुमच्या जीवनात नैराश्येपासून मुक्ती हवी असेल त्याचबरोबर जीवनात सर्वकाही आनंदमयभाव असं वाटत असेल तर, देवी चंद्रघंटेची उपासना केली पाहिजे. चला तर पाहूया देवी चंद्रघंटेची उपासना कशा पद्धतीने केली जाते.

चंद्रघंटा माता कोण आहे :
सर्वप्रथम देवी चंद्रघंटा ही नेमकी कोण हे जाणून घेऊया. देवी चंद्रघंटा हे दुर्गेच रूप असून देवीच्या माथ्यावर घंटा स्वरूपात चंद्रमा आहे आणि म्हणून नवरात्रीचा तिसरा दिवस दुर्गेच्या तिसऱ्या अवताराला म्हणजेच माता चंद्रघंटेला समर्पित केला जातो. देवी चंद्र घंटेचा तिसरा दिवस भयमुक्ती आणि अपार साहस प्राप्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी देवीच्या दहा हातांमध्ये वेगवेगळे शस्त्र आणि अस्त्र असतात. ज्योतिष शास्त्रप्रमाणे चंद्रघंटा देवीचा संबंध मंगळ ग्रहाची येतो. त्याचबरोबर चंद्रघंटा देवी मणिपूर चक्र नियंत्रित करते.

मणिपूर चक्र म्हणजे काय :
मणिपूर चक्र हे व्यक्तीच्या नाभीच्या मागील हड्डीस म्हटले जाते. हे मणिपूर चक्र कमजोर झाल्याबरोबर व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह उरत नाही. त्याचबरोबर व्यक्तीच्या मनात मोह आणि तृष्णा निर्माण होते. त्याचबरोबर मणिपूर चक्र कमजोर झाल्यानंतर व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टींची देखील घृणा वाटू लागते. कोणत्याही व्यक्तीच्या समोर राहण्यास देखील लाज वाटते. हाच मणिपूर चक्र मजबूत करण्यासाठी काय करावे पहा.

अशा पद्धतीने करा मणिपूर चक्र मजबूत :

1) मणिपूर चक्र मजबूत करण्यासाठी तुम्हाला मध्यरात्री लाल रंगाचे कपडे परिधान करावे लागतील. देवी चंद्रघंटेला तिसऱ्या दिवशी लाल रंगाची साडी नेसवली जाते. त्यामुळे आपण देखील लाल रंगाचे कपडे परधान केले पाहिजे. त्यानंतर भगवान शिव यांना हात जोडून नमस्कार केला पाहिजे.

2) त्यानंतर तुम्हाला माता दुर्गेच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावून लाल रंगाचं कोणतही फुल दुर्गे चरणी वाहील पाहिजे. असं केल्याने माता राणी तुमच्यावर प्रसन्न राहील.

3) त्यानंतर दोनही डोळे बंद करून आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुमचं मन एकाग्रह होईल.

4) पुढे तुम्ही तुमच्या गुरुचरणी स्वतःचा मणिपूर चक्र मजबूत करण्यासाठी प्रार्थना करू शकता. मनोभावे प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला लाभ देखील मिळेल.

5) मणिपूर चक्र आणखीन मजबूत करण्यासाठी तुम्ही लाल रंगाचा रेशमी धागा दुर्गेच्या चरणी समर्पित करून आपल्या कमरेला बांधू शकता.

माता दुर्गेसाठी तुम्ही तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करून, मातेच्या चरणी लाल रंगाची फुल वाहून सोबतच लाल चंदनाची छोटी लाकडी समर्पित करून आणि लाल रंगाची चुनरी मातेच्या चरणी समर्पित करून मणिपूर चक्र मजबूत बनवू शकता.

Latest Marathi News | Shardiya Navratri 2024 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Shardiya Navratri 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x