8 January 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

१२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवण्यामागील राजकारण काय? | भाजपची नेमकी अडचण काय? | सविस्तर राजकीय ठोकताळा

Mahavikas Aghadi

मुंबई, १५ ऑगस्ट | विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या आजूण पण रखडलेला आपण पाहतोय. विधानपरिषद आमदार नियुक्ती या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले आहेत. यावर अनेक चर्चादेखील झाल्या किंबहूना या आमदारांची नियुक्ती रखडण्यामागे भाजप चा हात असल्याची शक्यता देखील विरोधी पक्षांकडून वर्तवण्यात आली होती.

वास्तविक अनेकांना यात राजकारण आहे एवढंच वाटत असलं तरी त्यामागील भाजपचा विचार फार मोठा आणि भविष्यातील नुकसान रोखण्यासाठी असल्याचं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. मात्र या नियुक्त्या रोखण्यामागे अनेक कारणं असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात त्याचंच हे विश्लेषण;

12 आमदारांची नियुक्ती न झाल्यास भाजपला फायदा:
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटाघाटीवरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात फारकत झाली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. यामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भारतीय जनता पक्षाकडून हिरावून गेला. त्यामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नेहमीच भारतीय जनता पक्षाचा राहिलेला आहे. त्याच राजकारणातून 12 नामनिर्देशित सदस्य विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगतात.

विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्याने राज्य सरकारच्या अनुषंगाने विधेयकं पारित करण्यासाठी तेथे संख्याबळ असणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशत सदस्यांची वर्णी विधानपरिषदेत लागली तर, विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारची ताकद वाढेल हे भारतीय जनता पक्षाला चांगलंच ठाऊक आहे. ती ताकद वाढू नये यासाठीच राज्यपालाच्या माध्यमातून 12 आमदारांची नियुक्ती रोखली जात असल्याचे मतं राजकीय विश्लेषक मांडतात.

भाजप अजूनही या भ्रमात:
तसेच महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळून भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात येऊ शकते, ही आशा अद्यापही भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदार विधान परिषदेमध्ये नियुक्त झाल्यास भारतीय जनता पक्षाची सत्ता आता येऊ शकत नाही असा संदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकतो असंही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तसेच विधानपरिषदेत महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या वाढल्याने त्यांचा आटविश्वासही दुणावेल.

सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप विरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रतिनिधींची संख्या वाढेल:
राज्यपाल नियुक्त 12 आमदार विधान परिषदेमध्ये नियुक्त झाल्यास सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप विरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रतिनिधींची संख्या वाढेल तसेच यामध्ये अनेक अभ्यासू आणि अनुभवी नेते मंडळी असल्याने भाजप विरोधातील ताकद असून तीव्र होईल असं भाजपाला वाटत असावा असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीसाठी प्रचार करणाऱ्यांची संख्या वाढेल:
राज्यपाल नियुक्त 12 आमदार विधान परिषदेमध्ये नियुक्त झाल्यास त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ती फौज महाविकास आघाडीतील पक्षांसाठी आगामी महानगरपालिका आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ताकद म्हणून म्हणून पुढे येऊन एक प्रचार यंत्रणा म्हणून राज्यभर पाठवता येईल आणि ते भाजपाला नकोय असं देखील म्हटलं जातंय.

यादीत एकनाथ खडसेंच नाव:
या नियुक्त्या रखडण्यामागे एकनाथ खडसे यांचे नाव यादीत असण्याचे देखील एक कारण पुढे आलं आहे. एकनाथ खडसे विधानपरिषदेवर गेल्यास त्यांना मंत्रिपदाची दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. तसे झाल्यास ते उत्तर महाराष्ट्रात भाजपाला अजून मोठे देण्यास सज्ज होतील अशी भीती भाजपाला आहे. तसेच अनेक भाजप नेते त्यांच्या मार्फत राष्ट्रवादीच्या गळाला लागतील अशी धास्ती भाजपाला आहे असं देखील तज्ज्ञांनी म्हटलंय. तसेच भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जातोय, पण राष्ट्रवादी न्याय देत असं होऊ नये असं भाजपाला वाटत असल्याने आधीच भारती पवार आणि भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपदावर घेतल्याचं म्हटलं जातंय. पण छगन भुजबळ आणि एकनाथ खडसेंसारखे नेते राष्ट्रवादीकडे असल्याने ते भाजपाला किती शक्य होईल यातही तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळेच राज्यातील परिचित नसणारे चेहरे म्हणजे भारती पवार आणि भागवत कराड यांना जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ओळख समारंभ घडवले जात असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 12 MLC politics against MahaVikas Aghdi news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x